गुंज (ता.घनसावंगी): गोदावरी पात्राचे कोरडे वाळवंट झाले आहे. परिसरातील डोहात असलेल्या थोड्याफार पाण्यात आशेने जाळे टाकताना मच्छिमार.
गुंज (ता.घनसावंगी): गोदावरी पात्राचे कोरडे वाळवंट झाले आहे. परिसरातील डोहात असलेल्या थोड्याफार पाण्यात आशेने जाळे टाकताना मच्छिमार. 
मराठवाडा

कोरड्या गोदापात्रात डोहापुरती मासेमारी 

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  घनसावंगी तालुक्यातील गुंज परिसरातील कोरड्या गोदावरी नदीपात्रात आता डोहापुरती मासेमारी शिल्लक राहिली आहे. मत्स्य व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत. 

चार वर्षांनंतर परतीच्या पावसाने गोदावरीला महापूर आला, दोन-चार महिने मत्स्यव्यवसाय जोमात चालला. त्यानंतर हळूहळू पाणी वाहून गेले, गोदावरी आटत गेली, पात्राचे वाळवंट झाले. पाणी, मत्स्यव्यवसायाला घरघर लागली. या व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्या कुटुंबांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. 

परिसरात भादली, शिवणगाव, सिरसवाडी, गुंज, काळेगाव, कवडगाव आदी भागांत कहार समाजातील अनेक कुटुंब हा मत्स्यव्यवसाय करतात. गुंजमध्ये ६० ते ७० कुटुंबांची यावर उपजीविका आहे; मात्र यावर्षी जानेवारीपासूनच पाणीसाठा कमी कमी व्हायला सुरवात झाली. मार्च महिन्यात कोरोनामुळे मासे विकायला अडचण आली, तर एप्रिल आणि मे महिन्यात गोदावरीचे वाळवंट झाले. यामुळे मासे मिळणे अवघड झाले.

विकायला तर दूर कुटुंबापुरतेही मासे मिळणे अवघड झाले. काळुंकावस्तीजवळ असलेल्या छोट्या छोट्या डोहात आळीपाळीने एक जण जाळे टाकतो; मात्र जाळ्यात काहीच येत नाही. निराशा होते. काही न मिळताच अनेकांनी घरी परतावे लागते. 

गुंज येथे बंधाऱ्याची गरज 

गुंज येथे बंधारा नसल्याने आलेले पाणी लगेच वाहून जाते, तर वरच्या बंधाऱ्यातून खाली पाणी सोडल्या जात नाही. दोन-चार महिने मत्स्यव्यवसाय चालतो. त्यानंतर गोदावरी आटते. यामुळे पूर येईपर्यंत गोदावरीला थेंबही राहत नाही. त्यात वाळू उपसा असल्याने मोठी अडचण येते, पात्रात खड्डे पडतात. यासाठी गुंज येथे बंधारा असणे गरजेचे आहे, असे देविदास कचरे, गंगाधर बिजुरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT