NND14KJP04.jpg 
मराठवाडा

पाचशे लिटर गावठी दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात दारुबंदी असल्याचा फायदा घेत गावठी दारूचे उत्पादन करुन ते विक्रीच्या तयारीत असलेल्या चिकाळा तांडा (ता. मुखदेड) येथे उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. १४) धाड टाकली. यात ५१० लिटर गावठी दारुसह अडीचशे लिटर ताडी, दहा दुकाकी व एक ॲटो असा एकूण सात लाख बारा हजाराचा एवज जप्त करण्यात आला.

दारुबंदीचा फायदा घेत गावठी दारुचे उत्पादन
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने दारुबंदीचा निर्णय घेतला. या मुळे गावठी दारू काढणाऱ्यांची सध्या चंगळ होत आहे. जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील कोडग्याळवाडी तांड्यावर नुकतीच धाड टाकून पोलिसांनी गावठी दारुसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. यानंतर दारु काढणाऱ्यांना वचक बसली नाही.

चिकाळा तांडा येथे अड्डा
अवैध वाहतुकीची तपासणी करत असताना मंगळवारी (ता. १४) मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे गावठी दारु काढून त्याची विक्री करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या वरुन उत्पादन शुक्ल विभागाने कारवाइ केली. यात दारु काढणाऱ्याविरुध्द तेरा गुन्हे दाखल करुन एकूण १७ जनांना अटक केली आहे. यात यात आरोपींकडून ५१० लिटर हातभट्टी दारू, अडीचशे लिटर ताडी, दहा दुकाची, एक ॲटो असा एकूण सात लाख १२ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

जिल्हाधिकारी, उत्पादन अधीक्षकांची कारवाइ
ही कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे, निरीक्षक एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, श्री.कोतवाल, टी. बी. शेख, वाय. एस. लोळे, ए. के. शिंदे, के.के किरतवाड, यू. डी. राठोड, बी. एम. पवार, जी. व्ही. भालेराव आर. एस. बोदमवाड, संगेवार, जाधव यांच्या टिमने केली. 

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
विश्वनाथनगर येथीन राहुल देविदास जाधव (वय २०) या विद्यार्थ्याने खोब्रागडेनगर येथे छताला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १२) सकाळी साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी पंकज भगवान कपुरगे यांनी दिलेल्या माहितीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार श्री मिटके करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT