Dhagfuti Renapur News, Latur News 
मराठवाडा

पाचशे हेक्टरावरील पेरलेले सोयाबीन गेले वाहून, मोटेगाव परिसरात ढगफुटी

सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील मोटेगाव (ता. रेणापूर) परिसरात रविवारी (ता.२८) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या ढगफुटीने नदी-नाल्यांना पाणी येऊन जवळपास पाचशे हेक्टरांवर पेरलेले सोयाबीन वाहून गेले. जोरदार पावसामुळे अनेकांची वळणे फुटली, शेतातील माती वाहून जाऊन अनेक झाडे उन्मळून पडली. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात तीन ते चार फूट पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.


रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटेगाव, चाडगाव (ता. रेणापूर) परिसरात अचानक मोठा पाऊस होऊन ढगफुटी झाली. या पावसामुळे मोटेगाव परिसरातील माणिक सोमवंशी, राजाभाऊ सोमवंशी, सुनील सोळुंके, शिवाजी सोमवंशी, सचिन सोमवंशी यांच्यासह जवळपास दीडशे शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरलेले सोयाबीन वाहून गेले. नव्याने टाकलेले बांध फुटून शेतातील माती वाहून गेली. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. शिवाय अनेकांच्या गोठ्यांत पाणी शिरून गोठ्यात ठेवलेले खत व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.


मोटेगावलगतच्या नदीला व चोरंगळा, धनगरवाडा यासारख्या लहान ओढ्यांना पुराचे स्वरूप आले होते. जिकडे पाहावे तिकडे शेतात पाणी साचलेले दिसत होते. सध्या सर्व शेतात तीन ते चार फूट पाणी साचले आहे. अनेकांच्या शेतातील गोठ्यात असलेली जनावरे सध्या पाण्यातच उभी आहेत. पेरलेले सोयाबीन न उगवल्याने शेतकरी अगोदरच विवंचनेत असताना परत आता ढगफुटीने शेतकरी पार धुतला गेला आहे. अतिपावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर नवीनच मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सर्वत्र मोठा पाऊस झाला असला तरी कोठेही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती रेणा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माणिक सोमवंशी यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT