Jalna sakal
मराठवाडा

Jalna : जालन्यात अपघातात पाच जण जागीच ठार : मृतात दोन लहान मुलांचा समावेश

ऑटोरिक्षा - आयशरची समोरा समोर धडक

दीपक सोळंके

ऑटोरिक्षा - आयशरची समोरा समोर धडक

भोकरदन : भोकरदन जाफ्राबाद मुख्य मार्गावर प्रवासी ऑटोरिक्षा व आयशर वाहनाच्या समोरा-समोर झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. मृतात दोन बालकांसह एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, एक मुलगा व एक पुरुष या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून, वरील अपघातातील सर्व मृत व जखमी हे एकाच कुटूंबातील व बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदनकडून जाफ्राबादकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षा जाफ्राबादकडून भोकरदनकडे येणाऱ्या भरधाव आयशरने माहोरा गावाजवळील कापूस जिनिंगशेजारी असलेल्या शिवम धाब्याजवळ जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी भिषण होती की, या अपघातात ऑटोरिक्षा मधील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर माहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जालना येथे हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या अपघातातील सर्व मयत व जखमी हे एकाच कुटूंब असून, ते एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित ऑटोरिक्षाने गेल्याचे सांगण्यात येत आहे. मयत व जखमींची नावे समजली नसली तरी ते बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चुराडा झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

SCROLL FOR NEXT