Cannabis sale News 
मराठवाडा

तो पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला होता, पोलिसांनी पकडले, अन्‌ झाली पाच वर्षे शिक्षा 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात सर्रासपणे गांजा विकरणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी दोषी ठरवून 5 वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जावेद खान आयुब खान असे त्या आरोपीचे नाव आहे. 

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना 7 ऑगस्ट 2017 रोजी नुतन कॉलनी परिसरातील अजबनगरात गांजा विक्री करण्यासाठी एक तरुण पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंत यांच्या पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा रचून पिशवी घेऊन थांबलेल्या तरुणास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत त्याच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. अजबनगरात राहणारा जावेद खान अयुब खान (35, रा. अजबनगर, नुतनकॉलनी) याच्या ताब्यातून 2 किलो 182 ग्रॅम गांजा, मोबाईल, रोख 2 हजार 170 रुपये असा 11 हजार 682 रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस शिपाई सुधाकर राठोड यांच्या तक्रारीवरुन जावेद खान अयुब खान विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

पाच वर्षे सक्‍तमजूरी 
सहायक पोलीस निरीक्षक अखमल शेख यांनी तपास करुन जावेदखान विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायलायाने जावेदखानला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20 ब, नुसार दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT