beed sakal
मराठवाडा

Beed : गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पूर परिस्थितीची शक्यता

वैजीनाथ जाधव

गेवराई : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे शनिवारी दुपारी चार वाजता, चार फुटाने उंचावून एक लाख तेरा हजार १८४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात एक लाख सोळा हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र सावधानता बाळगावी असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या ग्रामस्थांना केले आहे. शिवाय ३२ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पंचाळेस्वर येथील दत्त मंदिराला पाण्याने वेढा घातला आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-जास्त होत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. शनिवारी जायकवाडी धरणातून सांडव्याव्दारे एक लाख तेरा हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. हा विसर्ग वाढवण्यात येणार असून यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान नाशिक तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात एक लाख सोळा हजार क्युसेक पाणी मावते परंतु जायकवाडी प्रकल्पातून एक लाख पंचवीस हजार ते दीड लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावांना पाण्याचा विळखा पडणार आहे.

दरम्यान राक्षभुवन व पंचाळेश्वर येथील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अधिकचे पाणी सोडल्यास गोदाकाठच्या गंगावाडी, राजापूर या गावाला पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या गावांतील नागरिकांनी गोदापात्रात जावू नये. पशुधनाची देखील काळजी घ्यावी. गोदापत्रातील वाढती पाणी पातळी पाहता सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या गावांना सतर्कतेचा इशारा

आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापुर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगाव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या ३२ गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident: कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू; जबलपूर मार्गावर भीषण अपघात, कांद्रीत संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Smriti Mandhana Sangeet: तेनु लेके मैं जावांगा... स्मृती-पलाशचा रोमँटिक डान्स; तर जेमिमाहसह महिला क्रिकेटपटूंनीही धरला ठेका

Latest Marathi News Live Update: : उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाण

Sangli Gunfire On Friend : दुचाकीवरून जाताना सहकारी मित्रानेच पाठीमागून खट् खट् खट्...गोळ्या झाडल्या, पुढं काय घडलं...; पुणे-बंगळूर हायवेवर थरार

Baba Vanga Predictions : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी! तुमच्यासोबत २०२६ सालात घडणार मोठ्या घटना; कुणाला मोठं नुकसान तर कुणाला फायदा

SCROLL FOR NEXT