संतोष गरड यांच्या शेतीतील फुलकोबी पिकाची तोडणी करण्यात आली. 
मराठवाडा

प्रतिकूल परिस्थितीत ‘कोबी’ने दिला आधार !

दिलीप मोरे

देवगावफाटा (जि.परभणी) : दिवसेंदिवस बदलत्या वातावरणीय परिस्थितीमुळे शेतीक्षेत्र बेभरवशी होत आहे. लोकांचा शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन वाढू लागला आहे. तरी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काही शेतकरी पिकांतून विक्रमी उत्पादन घेत आहेत. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगावफाटा (ता. सेलू) येथील शेतकरी संतोष गरड यांनी ‘फुल कोबी’ या पिकाच्या उत्पादनातून आर्थिक विकासाची किमया साधली आहे.

अनेक वेळा पडणाऱ्या बेभरवशी पावसावर अवलंबून राहून दुष्काळाशी दोन हात करावा लागतो. आर्थिक संकटांचा सामना करीत आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकांबरोबर शेतीविषयक नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस क्वचित काही शेतकरी करतात. त्यापैकीच एक संतोष गरड यांनी आपल्या स्वतःच्या दीड एकर क्षेत्रात बोअरच्या पाण्यावर फुलकोबी या पिकाची बावीस हजार रोपांची सरी पद्धतीने लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने गाईचे शेण व गोमूत्र यांच्या चार आळवण्या घेतल्या. 

दोन लाखांचे मिळाले उत्पन्न 
पिकांच्या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये दोन ते तीन वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी केली. फुलकोबी काढण्यायुक्त व्हायला साठ ते सत्तर दिवस लागले. पूर्ण वाढ झालेल्या एका फुलकोबीच्या गड्ड्याचे सर्वसाधारण वजन दीड ते दोन किलो भरले. त्यास प्रतिकिलो तीस ते साठ रुपयांपर्यंत भावदेखील मिळाला. या पिकासाठी दीड एकर क्षेत्रावर या शेतकऱ्याला खर्च पन्नास ते साठ हजार आला. तर यातून त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले.
दरम्यान, शेती कसून हाती काहीच राहत नसल्याचा सूर धरत आताची नवीन पिढी शेती सोडून शहरीभागात मिळेल तो कामधंदा करत आपला उदरनिर्वाह करत आहे. तर आजही अनेक तरुण उच्च शिक्षण घेत नोकरीच्या शोधात आहेत व अनेक जण तर शेतीची नाळ न तुटू देता व शेतीस दुय्यम न समजता ती व्यवसायिक पद्धतीने करत आहेत. त्यामुळे निश्चितच फायदा घेता येतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.


बेरोजगारीची समस्या दूर होईल
पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी युवा पिढीने भर दिल्यास बेरोजगारीची समस्या दूर तर होईलच; पण पर्यायाने शेतीद्वारे आर्थिक उन्नतीसुद्धा साधता येईल.
- संतोष गरड, शेतकरी, देवगावफाटा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT