beed  sakal
मराठवाडा

Beed News : अंबाजोगाई येथील बंद झालेल्या दूरदर्शन केंद्राच्या जागी आकाशवाणीच्या एफएम केंद्राला अखेर मुहूर्त

‘एफएम’ केंद्र १० किलो वॅटचे असून, ते जवळपास ५० ते ७० किलोमीटर अंतरापर्यंत प्रक्षेपणाची सेवा पुरवणार आहे. येत्या काही महिन्यांत याचे प्रसारण सुरू होणार आहे. एक वर्षापूर्वी हे केंद्र मंजूरही झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील बंद झालेल्या उच्च शक्ती दूरदर्शन केंद्राच्या जागी आकाशवाणीच्या एफएम केंद्राला अखेर मुहूर्त लागले. शुक्रवारी (ता.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून याची पायाभरणी झाली.

पिंपळा धायगुडा (ता. अंबाजोगाई) येथील दूरदर्शन केंद्राच्या जागेतच हे आकाशवाणी एफएम प्रसारण केंद्र येथे सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राची पायाभरणी केली. या केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, डॉ. एल. मुरगम यांची उपस्थिती होती. प्रत्यक्ष मुख्य केंद्राच्या ठिकाणी आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण झाले. अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पुणे येथील आकाशवाणीचे उपसंचालक अनिल पाटील, सहायक अभियंता सुरेश बोचरे, मनोज शहा, अनंतकुमार कोदंडे, बीडचे विजय डंबरे, गोपाळ ठाकूर, लक्ष्मीकांत भालेराव यांची उपस्थिती होती.

हे ‘एफएम’ केंद्र १० किलो वॅटचे असून, ते जवळपास ५० ते ७० किलोमीटर अंतरापर्यंत प्रक्षेपणाची सेवा पुरवणार आहे. येत्या काही महिन्यांत याचे प्रसारण सुरू होणार आहे. एक वर्षापूर्वी हे केंद्र मंजूरही झाले होते. मात्र त्याचे काम सुरू झाले नव्हते. तत्कालीन अधिकारी श्री. चापोलीकर यांनी याचा प्रस्ताव पाठविला होता. परळी येथील सामाजिक कार्यक्षेत्र चेतन सौंदळे यांनी या मागणीसाठी उपोषणही केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.

गंगाखेड ते किनगाव महामार्गाला मंजुरी

गंगाखेड : तालुक्यातील गंगाखेड, इसाद, सुप्पा, पिंपळदरी मार्गे किनगाव हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. सदरील रस्ता दोन जिल्ह्यांना जोडतो. या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होऊन यासाठी १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT