bycycal.jpg 
मराठवाडा

... या जिल्ह्यात दोन हजार विद्यार्थीनींची पायपीट

मंगेश शेवाळकर

हिंगोली : जिल्‍ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये मानव विकास मिशनअंतर्गत दोन हजार विद्यार्थिनींना सायकलवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शाळांनी बॅंकांचा आयएफएससी कोड दिला नसल्याने सायकलींसाठी दिला जाणारा निधी शाळांच्‍या बँक खात्‍यात जमा झाला नाही. त्यामुळे सदरील कोड शाळांनी तातडीने सादर करण्याच्‍या सूचना जिल्‍हा परिषदेने शाळा प्रशासनाला दिल्‍या आहेत. दरम्यान, शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपले तरी सायकली मिळाल्या नसल्याने विद्यार्थिनींना शाळेसाठी पायपीट करावी लागत आहे.
जिल्‍ह्यात हिंगोली, औंढा व सेनगाव तालुक्‍याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्‍यामुळे या ठिकाणी मानव विकास मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शिक्षण, आरोग्‍य, शेतीविषयक उपक्रमांसोबत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. शैक्षणिक उपक्रमांमध्ये तीन तालुक्‍यात सत्तावीस मानव विकासच्‍या बसेस सुरू करण्यात आल्‍या आहेत. शाळा भरणे व शाळा सुटण्याच्‍या वेळेनुसार या बसफेऱ्या सोडल्‍या जात आहेत. याशिवाय शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत ये - जा करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सायकलवाटपाची योजना हाती घेण्यात आली आहे. यामध्ये तीन तालुक्‍यांत सुमारे दोन हजार सायकलींचे वाटप केले जाणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात ६६६ सायकली वाटप केले जाणार असून त्‍यासाठी विद्यार्थिनींची माहिती मागविण्यात आली आहे. दरम्‍यान, जुलै महिन्यात मागविण्यात आलेली माहिती आता नोव्‍हेंबर महिन्यात देण्यात आली आहे. त्‍यातही अनेक शाळांनी बँक खाते क्रमांक दिले असले तरी बँकेचा आयएफएससी कोडच दिला नाही. त्‍यामुळे सायकल खरेदीसाठी आलेला निधी वाटप करणे कठीण झाले आहे. तर शैक्षणिक वर्षाच्‍या दुसऱ्या सत्रात विद्यार्थिनींना सायकली मिळाल्‍याच नाहीत. त्‍यामुळे विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
या प्रकारानंतर जिल्‍हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने तिन्‍ही तालुक्‍यातील शाळांना पत्र पाठविले आहे. यामध्ये ज्‍या शाळांच्‍या बँक खात्‍याचे आयएफएससी कोड नाहीत, त्‍यांनी सोमवारपर्यंत (ता. २५) कोड दाखल करावेत, अशी सूचना दिली आहे. सध्या तरी या कोडमध्ये सायकलींचा निधी अडकला असून आता सायकल कधी मिळणार याची प्रतीक्षा विद्यार्थिनींना लागली आहे.

६९ लाखांचा निधी धूळखात
जिल्‍ह्यातील तीन तालुक्‍यांत सुमारे दोन हजार सायकलींसाठी ६९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा निधी धूळखात पडला आहे. त्यामुळे पहिले शैक्षणिक सत्र संपले तरी अद्याप सायकल खरेदीला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : मुंबईत गेल्या २४ तासांत विक्रमी मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसही जोर कायम

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT