file photo 
मराठवाडा

फाॅरेन रिटर्न डॉ. चित्रा कुरेंच्या हाती हिंगोली जिल्ह्यातील या गावचा कारभार

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील डिग्रसवाणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी फाँरेन रिटर्न तथा वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. चित्रा कुरे तर उपसरपंचपदी अनिता आडळकर यांची सोमवारी (ता. आठ)  बिनविरोध निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथील रहिवासी असलेल्या डॉ. कुरे स्वीडन येथून पीएचडी करुन गावच्या विकासासाठी राजकारणात प्रवेश करत मुद्दाम निवडणूक लढविण्यासाठी गावात आल्या होत्या. व निवडणूकीत उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या. ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी पॅनल तयार करुन नऊ जागेसाठी उमेदवार उभे केले होते. यात त्यांचे आठ उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्या या पदाच्या एकमेव दावेदार मानल्या जात होत्या.

दरम्यान, सोमवारी डिग्रसवाणी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये डॉ. चित्रा कुरे यांचा सरपंच पदासाठी तर अनिता रमेशआपा आडळकर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निर्वाचन अधिकारी बि. पी. लहाने यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खंदारे, साळुबाई गौतम पाईकराव, हिम्मत खंदारे, उज्वला काशिनाथ नाईकवाल, मीना संतोष वसेकर, सुनिता जीवक खंदारे, लक्ष्मण आसोले हे सदस्य उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी नवनिर्वाचितांचा सत्कार केला. निवड प्रक्रियेसाठी श्री. जाधव, श्री.  खुडे यांनी सहकार्य केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Latest Marathi News Live Update: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

SCROLL FOR NEXT