beed
beed beed
मराठवाडा

बीडमध्ये पत्नीच्या छळामुळे वनरक्षकाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

बीड: वनरक्षक अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसिंग, ता. आष्टी) याने दीड महिन्यापूर्वी (ता. २८ मे) केलेली आत्महत्या पतीच्या छळामुळेच झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पत्नी आश्विनीसह तिचे आई-वडील व भावाविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला. शिरूर तालुक्यात वनरक्षक असलेले अनिल जगताप यांनी मुगगाव रोडवर झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीवरून पत्नी आश्‍विनी अनिल जगताप हिच्यासह तिचे वडील आजिनाथ देवराव भवर, आई विजूबाई देवराव भवर व भाऊ महेश आजिनाथ देवराव भवर (तिघेही रा. देसूर) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला.

‘लग्नाअगोदरच्या पगाराचा हिशेब दे’ म्हणून आश्‍विनी अनिल जगताप यांचा सतत छळ करीत होती. तसेच आई-वडिलांना पैसे दिले म्हणून तीने पतीला मारहाणही केली. जमीन, प्लॉट नावावर कर म्हणून सतत तगादा लावत होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ती कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली. पतीने बोलविल्यानंतर प्लॉट व जमीन नावावर केल्याशिवाय आपण येणार नाही असे तिने पती अनिलला बजावले. या सततच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT