Vijay Gavhane Join NCP In Presence Of Party Supremo Sharad Pawar
Vijay Gavhane Join NCP In Presence Of Party Supremo Sharad Pawar esakal
मराठवाडा

'भाजपात भ्रष्टाचाऱ्यांचे शुद्धीकरण', माजी आमदार विजय गव्हाणे राष्ट्रवादीत

गणेश पांडे

परभणी : भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी गुरुवारी (ता.१३) अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून आपली अवहेलना होत होती. तसेच सध्या (Parbhani Political News) भाजपात भ्रष्टाचारी नेत्यांचे शुध्दीकरण व निष्ठावंतांचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप करीत अॅड.विजय गव्हाणे (Vijay Gavhane) यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे मंगळवारी (ता.११) जाहिर केले होते. (Former MLA Vijay Gavhane Quit BJP And Join NCP In Presence Of Sharad Pawar In Mumbai)

गेल्या वर्षभरापासून गव्हाणे हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहत होते. अखेर त्यांनी गुरुवारी (ता.१३) मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी आदी उपस्थित होते.

भाजपात आपण प्रामाणिकपणेच काम केले. परंतु, पक्षास प्रामाणिक नेते व कार्यकर्त्यांची, निष्ठावानांची किंमत नाही असे सांगत आपण निष्ठेने काम केले. परंतू त्याचे चीज झाले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामही आपण निष्ठेनेच करणार आहोत.

- अॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT