peve 
मराठवाडा

वस्त्यांचे उजळणार भाग्य, कुठे ते वाचा...  

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः जिल्‍ह्यात दलित वस्‍तीचा विकास योजनेतंर्गत सन २०१९-२० मध्ये प्रस्‍तावित असलेल्या २० कोटी ८४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून त्‍यानिधीतून ५३६ कामांना केली जाणार आहेत.

जिल्‍हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त असलेल्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील निधीचे नियोजन लॉकडाउनमुळे तीन महिने अडकले होते. त्यात शिथिलता मिळाल्यानंतर पदाधिकारी व समाजकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दलितवस्‍तीचे नियोजन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. 

सदस्यासोबत विचार विनिमय
जिल्ह्यातील प्रत्‍येक सदस्यासोबत विचार विनीमय करून दलित वस्‍तीचे नियोजन आखण्यात आले होते. त्‍यानुसार २० कोटी ८४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्‍ह्यात २७६ ग्रामपंचायतमध्ये ४२५ अनुसुचित जाती वस्‍त्‍यांमध्ये ५३५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतनिहाय कामे 
हिंगोली तालुक्‍यातील ५४ ग्रामपंचायतमध्ये ९४ रस्‍त्‍यातील १२१ कामांसाठी चार कोटी ४१ लाख ४० हजार, कळमनुरी तालुक्‍यातील ४४ ग्रामपंचायतमधील ५८ वस्‍त्‍यातील ७५ कामांसाठी दोन कोटी ७७ लाख ९० हजार, वसमत तालुक्‍यातील १४६ कामांसाठी पाच कोटी ६१ लाख ५० हजार, औंढा नागनाथ तालुक्‍यातील ३५ ग्रामपंचायतमधील ५७ वस्‍त्‍यामधील ६९ कामांसाठी दोन कोटी ८८ लाख ३० हजार तर सेनगाव तालुक्‍यातील ६९ ग्रामपंचायतमधील ११० वस्‍त्‍यातील १२५ कामांना पाच कोटी २४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण, पाणीपुरवठा ही कामे होणार 
जिल्‍हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंढे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलींद पोहरे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी ए. एल. बोंदे यांनी वस्‍तीच्या कामांना मंजूरी दिली आहे. त्‍यानंतर या वस्‍त्‍यामध्ये पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, सिमेंट रस्‍ता आदी कामे केली जाणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्‍येक सदस्यासोबत विचार विनीमय करून दलित वस्‍तीचे नियोजन आखण्यात आले होते. त्‍यानुसार २० कोटी ८४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्‍ह्यात २७६ ग्रामपंचायतमध्ये ४२५ अनुसुचित जाती वस्‍त्‍यांमध्ये ५३५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT