Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan sakal
मराठवाडा

निवडणुकीमुळे लोकशाहीचा पाया अबाधित

परिसंवादात लेखक आणि लोकशाही मूल्यांची संकल्पना स्पष्ट

बाबासाहेब उमाटे

उदगीर - ‘भारतीय लोकशाहीची संकल्पना व्यापक असून निवडणुकीमुळे लोकशाहीचा पाया अबाधित राहतो, असे स्पष्ट मत आज झालेल्या परिसंवादात व्यक्त झाले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लेखक आणि लोकशाही मूल्ये या विषयावर परिसंवाद झाला. हेमांगी जोशी, दिलीप चव्हाण, सोनाली नवांगूळ, हलिमा कुरेशी, अतुल देऊळगावकर, राजकुमार तांगडे आदी सहभागी झाले होते. देऊळगावकर म्हणाले, की राज्यात १९५० च्या दरम्यान नदीला आलेला पूर केवळ एक दिवस राहत होता. आता चार दिवस पूर असतो. विकास कोणाचा, कोणासाठी आणि कोणाला विचारून करत आहोत, हे पाहणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली पाणथळ जागेवर टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. त्यातून पुरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.’

नवांगुळ म्हणाल्या, अपंग देहाचे वस्त्रहरण करून येथे पैसे कमावले जात आहेत. त्यामुळे अपंग नागरिक खचून जात आहेत. आपल्या मानसिकतेचे मूल्य व पाया मजबूत करणे गरजेचे असून त्यासाठी लेखकाने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लिहिते झाल्यास सृजनशील समाज निर्माण होईल. जोशी म्हणाल्या, ‘‘सध्या लोकशाहीत उद्योगपती, बहुराष्ट्रीय कंपन्याचा प्रभाव वाढत आहे. धनिकांना परवडेल असे धोरण सध्या राबविले जात आहे. लोकशाही श्रीमंतांच्या हातात जात आहे, यासाठी लेखकांनी लिहिते व्हावे.’’ कुरेशी म्हणाल्या, ‘‘आपण आपली ओळख मानव अशी करणार नाही, तोपर्यंत लोकशाही सर्वसामान्यांपर्यंत पोचली असे म्हणता येणार नाही.’’ तांगडे म्हणाले, ‘‘सध्या मोठमोठ्या रस्त्यांनी शहरे जोडली जात आहे, मने जोडण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी लेखकाने व्रतस्थपणाने लेखन करून लोकशाहीचे मूल्य जपणे गरजेचे आहे.’’ चव्हाण म्हणाले, ‘‘आजपर्यंत आपण झुडींचे राजकारण करत आलेलो आहोत. भारतीय समाजाची घडण लोकशाही होत असून ती सुधारण्यासाठी लेखक, समाजव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवणे गरजेचे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT