unnamed 
मराठवाडा

साडेचार लाखाचे लाच प्रकरण ; उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी 

गणेश पांडे

परभणी ः विकास कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी चार लाख ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह इतरांना बुधवारी (ता.नऊ) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

गंगाखेड नगरपालिकेतील विकासकामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी गंगाखेड नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाकडे या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळविण्यासाठी नगर पालिकेतील एक नगरसेवक उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, या प्रस्तावाच्या एकूण रक्कमेच्या दीड टक्केप्रमाणे चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी अन्य दोघा कर्मचाऱ्यांच्यामार्फत केली होती. 

नगरसेवकाने केली होती तक्रार 
याबाबत संबंधित नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून श्री. सूर्यंवशी यांच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यात उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या समंतीवरूनच नगर प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व गंगाखेड पालिकेचे स्थापत्या अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी प्रशाकीय मान्यतेसाठीच्या चार लाख ५० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून मंगळवारी (ता.आठ) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत अव्वल कारकून श्री. करभाजने व अभियंता अब्दुल खयुम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून साडेचार लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस सु्त्रांनी दिली. 

श्रीमती सूर्यवंशी यांच्या घरी सापडले घबाड 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना अटक केल्यानंतर लगेच त्यांच्या शिवाजी नगर (परभणी) येथील घराची झडती घेण्यास सुरवात करण्यात आली. या झडतीमध्ये नऊ लाख ३१ हजार रुपयांची रोकड सापडली आहे अशी माहिती पोलिस उपाधिक्षक भरत हुंबे यांनी दिली. तसेच त्यांचे हिंगोली येथेही घर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची ही चौकशी केली जाणार आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT