संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड जिल्ह्यात चौघे ठार, असे घडले अपघात....

सकाळ वृत्तसेवा

बीड -  तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात बुधवारी (ता. आठ) घडल्या. एक अपघात बीडजवळील चऱ्हाटा फाटा, दुसरा याच तालुक्‍यातील मैंदाजवळ रात्री उशिरा झाला. तिसरा अपघात कारी फाटा (ता. धारूर) येथे घडला. राजेंद्र वसंत घुमरे (वय 29, रा. गाढेपिंपळगाव, ता. परळी), कुंडलिक सदाशिव होके (वय 28, रा. केज), गोरख आबासाहेब मदने (रा. 20, कारी, ता. धारूर) व अमोल उजगरे (रा. वडवणी) अशी मृतांची नावे आहेत.

राजेंद्र घुमरे व कुंडलिक होके हे दुचाकीवरून जात असताना शहराजवळील नगर रोडवरील चऱ्हाटा फाटा येथे त्यांच्या दुचाकी (एमएच-43 टी-4542) व बसची (एमएच- 40 एन-9176) समोरासमोर जोराची धडक झाली. यात राजेंद्र घुमरे व कुंडलिक होके हे दोघे जागीच ठार झाले. दुसरा अपघात बीड तालुक्‍यातील मैंदाजवळ रात्री उशिरा झाला. यात अमोल उजगरे यांचा मृत्यू झाला.

तिसरा अपघात धारूर तालुक्‍यातील कारी फाट्यावर झाला. कारी (ता. धारूर) येथील गोरख आबासाहेब मदने कामानिमित्त तेलगाव येथे आले होते. काम आटोपून ते रिक्षाने परत गावी निघाले. कारी फाट्यापासून पुढे थोड्या अंतरावर रिक्षातून उतरून चालकाला पैसे देत असताना भरधाव येणाऱ्या कारने (एमएच-13 सीएस) जोराची धडक दिली. यात आबासाहेब मदने गंभीर जखमी झाले. बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. गोरख मदने यांच्यामागे आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT