file photo
file photo 
मराठवाडा

निष्काळजीपणाचा ठपका ठेवत जिंतूर येथील सहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

गणेश पांडे

परभणी : वीज बिलाच्या तक्रारीचे दखल न घेणे, वीज बिल दुरुस्त न करणे, अनधिकृतपणे आकडे टाकून विजेचा वापर चालू असणे, गैरवर्तन, कामात अनियमितता व निष्काळजीपण इत्यादी गंभीर प्रकार महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या तपासणीत आढळून आल्याने  महावितरण जिंतूर ग्रामीण शाखा येथील एक सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक यांना निलंबित केले आहे. तसेच परभणी येथील अधीक्षक अभियंता यांनी कर्मचाऱ्यांवर अधिक नियंत्रण ठेवण्याच्या सूचना प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथील पाच पथकाने ता. 10 मार्च रोजी परभणी जिल्ह्यात थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केलेल्या  ग्राहकांची फेरतपासणी केली. जिंतूर येथील शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चारठाणा भागात सॉमिल व पिठाच्या गिरणी येथे अनधिकृतपणे विजेचा वापर सुरु होता. या प्रकरणी त्वरित पंचनामा करणे, वीज पुरवठा खंडित करणे व गुन्हा नोंद करणे इत्यादी कार्यवाही न केल्याने येथील महावितरण सहाय्यक अभियंता विनायक उत्तमराव दिग्रसकर यांना अधिक्षक अभियंता परभणी यांनी निलंबित केले आहे. अशा प्रकारे अनधिकृत वीज वापरावर प्रतिबंध करण्यासाठी संबंधित ग्राहकावर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच जिंतूर ग्रामीण शाखा कार्यालय परिसरात पिठाची गिरणी व सॉमिल या ठिकाणी अनधिकृतपणे विजेचा वापर सुरु असल्याप्रकरणी व चारठाणा, पाचलेगाव येथे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात आकडे आढळून आल्याने कामात अनियमितता व गैरवर्तन, वीज बिल वसूलीत दुर्लक्ष  करून कंपनीच्या महसूलाचे नुकसान करणे इत्यादी दोषारोप  प्रकरणी प्रधान तंत्रज्ञ आत्माराम दत्तराव ननवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ अब्दुल रहेमान अब्दुल हमीद, विघुत सहायक खुशाल ज्ञानदेव कऱ्हाळे  यांना निलंबित करण्यात आले आहे. या तपासणी कामात अनियमितता आढळून आल्याने सहायक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच नांदेड येथे महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथील पथक आज थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची नांदेड येथे फेरतपासणी करण्यात येत आहे. अशीच थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची फेरतपासणी मराठवाड्यात करण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर व बामणी येथे वीज बिलाच्या तक्रारीचे दखल न घेणे, वीज बिल दुरुस्त न करणे व प्रशासकीय कामात अनियमितेचा ठपका ठेवून गंगाखेड ग्रामीण शाखा तंत्रज्ञ साहेबराव विनायक पवार, व विनोद भारत गुरव, जिंतुर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ बजरंग सखाराम साबळे, सुरेश पांडूरंग तारु, सुरेश साहेबराव खंदारे, तंत्रज्ञ नरेश लालपट बनपुरे यांची परभणी मंडलाबाहेर बदली करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT