file photo 
मराठवाडा

नांदेडला होणार चारशे कोटीचा पूल, कुठे ते वाचा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता आता रस्ते कमी पडू लागले आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी शहरात कुठे ना कुठे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे आता वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी काही ठिकाणी उड्डाण पुल उभारण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. 
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असून त्यासाठी देगलूर नाका भागात उड्डाणपूल उभारण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासंदर्भात पाहणी आणि चाचपणी सुरू झाली आहे.

उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे
नांदेड शहरात येण्यासाठी देगलूर नाका भागात असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे या बाबत २०१४ - १५ पासून या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्याची मागणी होत आहे. महापालिकेच्या वतीनेही या बाबत दोन - चार वेळा सभेमध्ये चर्चा झाली होती. मात्र, निधीचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यामुळे नांदेड शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली बैठक
मागील आठवड्यात श्री. चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृहातील मिनी सह्याद्रीमध्ये महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नांदेड शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांबाबत माहिती घेऊन चर्चा केली होती. महापालिकेकडे मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासंदर्भातही चर्चा झाली होती. त्याचबरोबर मागील काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाबतही चर्चा करण्यात आली होती.

गुरुद्वारा चौकातही नियोजन
देगलूर नाका येथे बरकत कॉम्प्लेक्स (मॅफको रोड) ते वाजेगाव पोलिस चौकी असा गोदावरी नदीवरील पुलासह चार पदरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. या उड्डाणपुलाची लांबी २२०० मीटर राहणार असून रस्ता रुंदी ३० मीटर राहणार आहे. त्यासाठी जवळपास चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गोदावरी नदीवरील सध्याचा जुना पूल हा निजामकालीन असून तो १९२९ मध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल तयार करावा लागणार आहे. त्याचबरोबर गुरुद्वारा भागातही चौकामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT