four people killed in Beed district in two accidents
four people killed in Beed district in two accidents 
मराठवाडा

दोन अपघातात बीड जिल्ह्यात चौघे ठार

दत्ता देशमुख

शिरुर कासार (बीड) : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात चौघे ठार झाले. पहिला अपघात शुक्रवारी (ता. 14) रात्री 11 वाजता परिसरातील काकडहिराजवळ झाला. दुसरा अपघात रायमोह (ता. शिरुर कासार) येथे शनिवारी (ता. 15) पहाटे एक अपघात तागडगाव (ता. शिरुर कासार) फाट्यावर घडला.

शुक्रवारी रात्री बीडजवळील एका हॉटेलवर जेवण करुन दोघेजण दुचाकीवरुन जात असताना तळेगाव - काकडहिरा रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये सुनिल किसन जाधव (वय 26, रा. मन्यारवाडी) व तुकाराम चिकने (रा. गंगावाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना तागडगाव (ता. शिरुर कासार) येथे शनिवारी पहाटे घडली. नामदेव महादेव गवळी (वय 28, रा. गोमळवाडा) व विठ्ठल लक्ष्मण जायभाये (वय 50, रा. पिंपळनेर) हे दोघे दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच. 17, टी. 2806) जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT