Parbhani Accident News esakal
मराठवाडा

Parbhani : परभणीतील भीषण अपघातात नांदेडचे ४ ठार, तर ४ गंभीर जखमी

जीप व क्रुझरचा भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

पालम (जि.परभणी) : पालम (Palam) तालुक्यातील पेठशिवणी जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणीच्या समोरील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता.२६) जीप व क्रुझरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. क्रुझरमधील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील खरब धानोरा येथील विवाहा सोहळा आटोपून क्रूझर ही लोहा-गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरून गंगाखेडकडे (Gangakhed), तर कार पालमकडुन लोह्याकडे भरधाव वेगाने जात असताना या दोन्ही वाहनांनी समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जण (Parbhani) जागीच ठार झाले. मृत एकाच कुटुंबातील होते. अनिल लक्ष्मीकांत जहागिरदार (वय ५६), शांताबाई लक्ष्मीकांत जहागीरदार (७०), लक्ष्मीकांत देविदासराव जहागिरदार (७६), विलास साळवे ( ४७, सर्व रा. नांदेड) असे मृतांचे नावे आहेत. क्रुझरमधील मोहन शेटे (वय ३५), दिगंबर शिंगारे (४९), पंडित दयाळ (४६) यांच्यासह इतर सात ते आठ अशी गंभीर रित्या जखमी झाली आहेत. (Four People Of Nanded Residents Died In Accident In Parbhani)

यांच्यावर पालम येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील पाठवण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गावंडे, पोलिस निरीक्षक काकडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शहाणे, भोसले, नामदेव राठोड, ससाने, आगळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेऊन मदत कार्य केले. मृत्युंजय दूत, भगवान करंजी, बालाजी बर्डे, रुपेश सिंगारे व रमेश शिंगारे यांच्यासह अनेक नागरिकांनी स्थळावर मदत कार्य सुरू केले

जहागिरदार कुटुंबावर काळाचा घाला

नांदेड येथील रहिवासी असलेले जहागिरदार कुटुंबातील आई-वडील आंबेजोगाई येथील राहत होते. त्यांना अंबाजोगाई येथून नांदेडला (Nanded) कारने येत असताना पेठशिवनीजवळ बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणी जवळ झालेल्या भीषण अपघातात आई, वडील व मुलगा जागीच ठार झाला असून जागीदार कुटुंबावर मोठे संकट कोसळेल आहे. तर गंभीर जखमी झालेल्या विलास साळवे यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT