life-imprisonment-
life-imprisonment- Esakal
मराठवाडा

परभणी : डंबाळे खून प्रकरणात चौघांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कुंडी (ता. सेलू) येथील राहुल देविदास डंबाळे यांच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने मंगळवारी (ता. १५) चार जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सेलू पोलिस ठाण्यात ता. १८ मार्च २०२० ला रात्री सव्वादहा वाजता तीन व्यक्ती शस्त्रानिशी आल्या व कुंडी येथील राहुल देविदास डंबाळे यांचा आम्ही खून केला, असे म्हणू लागल्या. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी या तिघांना ताब्यात घेतले. कुंडी येथील एका गल्लीत राहुल डंबाळे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळून आला. राहुल डंबाळे व एकनाथ डंबाळे यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता. त्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याचा राग मनात धरून ता. १८ मार्च २०२० ला राहुल हे त्यांच्या आईसोबत अंगणात बसलेले असतानाच संतोष डंबाळे, कपिल डंबाळे आणि मिलिंद कांबळे यांनी अचानक येत धारदार शस्त्राने राहुल यांच्यावर वार केले. यावेळी प्रकाश डंबाळे याने राहुलला मारण्यात या तिघांना प्रवृत्त केले असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक श्रीमती बोरगावकर यांनी या घटनेत आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले; तसेच आरोपीकडील शस्त्र, गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले. सीएच्या अहवालात मृताचा रक्तगट व आरोपीच्या शस्त्रावरील व कपड्यांवरील रक्तगट एकच आला. तपासात पोलिस नाईक विलास सातपुते, पोलिस नाईक रामेश्‍वर मुंडे यांनी मदत केली. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा एकत्रित करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारपक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रमुख सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी मंगळवारी संतोष डंबाळे, कपिल डंबाळे, प्रकाश डंबाळे व मिलिंद कांबळे या चौघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील दराडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT