file photo
file photo 
मराठवाडा

‘त्या’ चार जणांना होम कोरंटाईन 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉकडाऊनमुळे पुणे येथून पायी चालत नांदेडला येऊन घरात गुपचूप बसलेल्या ‘त्या’ चार जणांना प्रशासनाने घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे शनिवारी (ता. ११) रात्री उशिरा होम क्वारंटाइन करण्यात आले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी आपी माहित संबंधीत पोलिस ठाणय्त किंवा जिल्हा प्रशासनास कळवून स्वत: होमक्वारंटाईन व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यापूर्वीच केले आहे. 

शहरातील समतानगर भागातील रहिवाशी असलेले काही लोक पुणे येथे नोकरी करत होते. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पुण्यातून ही मंडळी पाई चालत नांदेडला आली. चार दिवस चालून आल्यानंतर रात्री उशिरा नांदेड शहरात दाखल होऊन या सर्वांनी घरात राहणे पसंत केले. परंतु ही बाब त्या भागातील नागरिकांच्या लक्षात आली व त्यांनी रात्री उशिरा प्रशासनाच्या लक्षात हे आणून दिले.

आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाची तत्परता 

वेळ रात्री साडेअकराची जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासाठी असलेल्या मिडिया कक्षातील डॉ. दीपक शिंदे यांचा फोन सतत वाजत होता. रात्री उशिर झाला असल्याने काहीतरी महत्वाचे व तातडीचे असावे म्हणून फोन उचलला तेव्हा समोरून आवाज आला समतानगरमध्ये काही जण पुण्याहून येऊन थांबले आहेत. समोरची व्यक्ती म्हणाली या भागातील सुमारे दोनशे नागरिक रस्त्यावर उभे आहेत पुण्याहुन आलेले हे लोक घरात सतत खोकलत आहेत आम्हाला भीती वाटते.  

होम क्वारंटाईन करण्यात आले

प्रकार थोडा गंभीर वाटल्याने तातडीने हा प्रकार दीपक शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे याना कळवला. यावर तात्काळ शासकीय रुग्णालय व भाग्यनगर पोलीस   याना संदेश दिले. या घटनाक्रम होईपर्यंत रात्रीचे साडेबारा झाले होते. रात्री उशिरा भाग्यनगर पोलिस व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक या सर्वांनी मिळून या चौघांना ताब्यात घेतले शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना होम क्वारनटाईन करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT