फोटो 
मराठवाडा

नांदेडात चौथीच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या माळटेकडी परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत चौथीतील मुलीचा त्याच शाळेतील एका शिक्षकाने मोबाईलवर अश्‍लिल चित्र दाखवून विनयभंग केला. ही घटना शनिवारी (ता.  एक) फेब्रुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. यानंतर सोमवारी (ता. तीन) संतप्त पालकांनी शाळेत येऊन त्या शिक्षकाला चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी भेट दिली. 

शहराच्या माळटेकडी परिसरात प्रबोधन प्राथमीक ही चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीसरी व चौथीतील मुलींना वरच्या खोलीत नेऊन विकृत असलेला शिक्षक स्वप्नील शृंगारे हा मागील पाच ते सहा महिण्यापासून विनयभंग करत असे. एवढेच नाही तर तो मुलींना आपल्या मोबाईलमधील अश्‍लिल फोटो दाखवून त्यांना पार्श्‍वभागाला हात लावण्यास सांगत असे. हा प्रकार जर तुम्ही घरी सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकतो तसेच शाळेवरून फेकून देऊन ठार मारून टाकतो अशी धमकी देत असे. 

मुख्याध्यापकाला दम देताच आरोपीला केले हजर

एवढेच नाही तर हा प्रकार त्याचा मागील सहा महिण्यापासून सुरूच होता. घडलेला प्रकार मुलींनी आपल्या घरी आईला सांगितल्याने समोर आला. या नराधम शिक्षकाने एक नव्हे तर अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी आल्याने पालकांनाही काही करता आले नाही. सोमवारी (ता. तीन) सकाळी शाळा भरली. मात्र स्वप्नील श्रृंगारे हा शाळेत आला नव्हता. त्याला केल्या पापाची कुणकुण लागल्याने तो घरीच होता. मात्र इकडे पालकांनी मुख्याध्यापक श्री. वन्ने यांना घेरले. जोपर्यंत तुम्ही स्वपनील श्रृंगारेला बोलावणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. यानंतर मुख्याध्यापकांनी त्याला बोलावून घेतले. तो शाळेत येताच पालकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

पोलिसांनी आरोपी शिक्षकाला केली अटक

यानंतर काही मिनीटातच विमानतळ पोलिस निरिक्षक संजय ननवरे हे तेथे पोहचले. त्यांनी स्वप्नील श्रंगारेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर केले. यानंतर पालक, विद्यार्थी व काही समाजसेवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी पिडीतांना व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. एवढेच नाही तर घटनास्थळाची भेट घेतली. त्याप्रमाणे तपासाच्या सुचना दिल्या. पिडीत बालिकेच्या पालकानी दिलेल्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंग, बाललैंगीक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला कडक शिक्षा करा

शंकरनगर (ता. बिलोली) येथील सहावीतील मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतांनाच पुन्हा या घडलेल्या घटनेने पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यातील एक मुख्य आरोपी अद्याप पोलिसांना सापडला नाही. तर ही दुसरी घटना घडल्याने जिल्‍ह्यात संतापाची लाट पसरली आहे. या शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 
-संदीप वन्ने, जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT