File photo
File photo 
मराठवाडा

तरुणांची फसवणूक करणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : वैशाली जनआरोग्य सुरक्षा योजनेच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला उस्मानाबाद शहरातील एका लॉजमधून अटक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सध्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.


याविषयी मिळालेली माहिती अशी, की एका वृत्तपत्रातून आरोग्यदूत या पदाची भरती होणार अशी जाहिरात देण्यात आली होती. अर्ज करण्यासाठी उस्मानाबाद येथील पत्ता देण्यात आला होता; तसेच अर्ज भरण्यासाठी 1200 रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. त्याशिवाय मुलाखतीला आल्यानंतर उमेदवारांकडून कोरे धनादेशदेखील घेण्यात आल्याचे समोर आले आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न या टोळीने केला होता; मात्र ही बाब काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा मुलाखती घेणाऱ्यांनी नोंदणी न केलेल्या संस्थेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासात तरुणांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या नावाने नोकरीचे आमिष दाखवून देणगी घेतल्याचे फिर्यादीत तरुणांनी नमूद केले. दरम्यान, किती जणांची फसवणूक झाली याची माहिती मिळालेली नसली तरी तक्रार देणाऱ्या तरुणांचा अनुक्रमांक 38 वा असल्याने ही संख्या मोठी असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT