Farmer Baban Tupe Sakal
मराठवाडा

Tomato : चाळीस गुंठ्यांत शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न; टोमॅटोला मध्यप्रदेशात मागणी

फुलंब्री तालुक्यातील सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या शेलगाव खुर्द या छोट्याशा गावातील तरुण शेतकऱ्याने चाळीस गुंठ्यांत टोमॅटोची लागवड करून घेतले लाखोंचे उत्पन्न.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - तालुक्यातील सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या शेलगाव खुर्द या छोट्याशा गावातील तरुण शेतकऱ्याने चाळीस गुंठ्यांत टोमॅटोची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले असून, या गावरान टोमॅटो पिकाला आता थेट मध्यप्रदेशातून मागणी होत आहे. आठवड्याला सुमारे वीस क्विंटल टोमॅटोची विक्री होत असून यातून बळिराजा आर्थिक समृद्ध झाल्याचे चित्र आहे.

बबन मुकुंदा तुपे (रा.शेलगाव खुर्द, ता. फुलंब्री) या शेतकऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १४० कॅरेट टोमॅटो विकले असून यातून साडेतीन लाख रुपयांचा नफा कमविला आहे. अजूनही टोमॅटोच्या झाडाची क्षमता चांगली असल्यामुळे आणखी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न होणार आहे. त्यामुळे एकंदरीत चार महिन्यांत चाळीस गुंठ्यांत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न हाती येणार असल्याचे शेतकरी तुपे म्हणाले.

शेलगाव खुर्द येथील गट नंबर ८४ मध्ये चाळीस गुंठ्यांमध्ये टोमॅटोची २५ एप्रिल २०२३ रोजी लागवड केली होती. एप्रिल महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बहुतेक वेळा करपा व इतर रोगांनी नष्ट होतात. या संकटांवर मात करून शेतकरी तुपे यांनी चाळीस गुंठ्यांत टोमॅटोची लागवड केली. त्यावेळी टोमॅटो तीन-चार रुपये किलोने विकले जात होते.

पुढील बाजार भावाचा विचार न करता त्यांनी पिकासाठी मेहनत घेतली. चाळीस गुंठ्यांतील टोमॅटोला जवळपास लाखभर रुपये खर्च केला. मात्र, त्यातून आजपर्यंत साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अद्यापही सुमारे दीडशे कॅरेट उत्पन्न निघणार आहे. आतापर्यंत निघालेल्या टोमॅटोला मध्यप्रदेश येथील बाजारात चांगला भाव मिळत असल्याने तिथे माल पोहोच केल्याचे या शेतकऱ्याने सांगितले.

लहान मुलाप्रमाणे घेतली काळजी

शेतकऱ्याने सदरील टोमॅटोचा प्लॉट चांगला आणण्यासाठी भरपूर मेहनतही घेतली. शेतात तण होऊ न देण्यासह विविध काळजी घेत द्रवरूप खते व फवारणी नियमितपणे चालू ठेवले. चांगला प्लॉट आणून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांचे व व्यापाऱ्याचे लक्ष्य वेधले. सकाळपासून सायंकाळपर्यंत लहान मुलाप्रमाणे या टोमॅटोच्या झाडांची निगा राखल्याने याचा त्यांना फायदा झाला.

एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यावेळेस उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे रोपे जगविणे कठीण होते. जमिनीची धूप कमी होण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या. आज टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाल्याने मेहनतीचे चीज झाले.

- बबन तुपे (शेतकरी, शेलगाव खुर्द ता.फुलंब्री)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा अडचणींचा सामना

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT