गाडेकर सासू-सुनेने तयार केलेले रुखवताचे साहित्य.
गाडेकर सासू-सुनेने तयार केलेले रुखवताचे साहित्य. 
मराठवाडा

गाडेकर सासू-सुनांचा ‘आदर्श’ गृहउद्योग...

गणेश पांडे

परभणी : आज सासू-सुना एका विचाराने एकत्र येऊन एखादा गृहउद्योग सुरु करणे, असे चित्र कमी ठिकाणी पहायला मिळेल. परंतु, परभणी शहरातील गाडेकर सासू-सुनांनी एक ‘आदर्श’ नात तयार केलंच, शिवाय ‘आदर्श’ गृहउद्योगही सुरु केला आहे. त्यांनी तयार केलेल्या रुखवताच्या आकर्षक साहित्याला राज्यातील वेगवेगळ्या शहरातून मागणी येत आहे. त्यांची ही वाटचाल इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गजानननगरमधील मंगला गिरीष गाडेकर व त्यांच्या सूनबाई सारिका मंगेश गाडेकर या दोघींनी १८ - १९ वर्षांपूर्वी घरातच रुखवत तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. दोघीजणी कलाकुसरीमध्ये तरबेज आहेत. मंगला व सारिका गाडेकर यांना बालपणापासून रंगरेषाचा संबंध आलेला. घरात कुणी मूर्तिकार, तर कुणी अन्य कलाकुसरीचे व्यवसाय करणारे सदस्य असल्यामुळे सहाजिक दोघींच्याही अंगात कुलाकुसर जन्मजातच होती. त्यामुळे घरात काही ना काही वस्तू करून सजावट करण्याचे काम दोघी सातत्याने करत होत्या.


१९ वर्षांखाली गाडेकर यांच्या घरात सरिका गाडेकर यांचे सून म्हणून आगमन झाले. मग काय? सासूबाई अधिच हौशी, त्यात सारिका गाडेकर यांच्यासारख्या कलेची आवड असलेली सून मिळाल्यानंतर दोघींची गट्टीच जमली. मंगला गाडेकर या सुरवातीपासूनच लग्नाच्या रुखवतासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करत असत. त्यामुळे सारिका गाडेकर यांनी घरात येताच सासूबाईच्या कामात स्वत:लाही गुंतवून घेतले. मग काय? दोघींच्या हातातून एकेपेक्षा एक कलाकृती जन्माला येत होती. आकर्षक व विविध रंगी वस्तू तयार होत असल्याने गाडेकर यांच्या रुखवताचा मागणी अधिकच वाढली. आपला व्यवसाय वाढत असल्याचे पाहून मंगला गाडेकर यांनी गाडेकर  गृहउद्योगाच्या माध्यमातून या वस्तूची विक्री सुरु केली. आज दोघींनी मिळून परभणीशहरात गाडेकर गृहउद्योगाचे नाव मोठे केले आहे.

काय असतात वस्तू
लग्नात लागणारे रुखवत, अर्थात राजराणी खुर्ची, डोली, सप्तपदी, चुडा, सौभाग्य अलंकार, खणनारळ, वेणी, हलव्याचे दागिने, कुरुड्या, पापड्या, सुपारीपासून तयार  केलेल्या बाहुल्या, चप्पलचे स्टॅन्ड, फुलांचे विविध प्रकार, आईचा निरोप, सुपटोपली, महादेव, पांढऱ्या शेवया, रंगीत शेवया, शेवयाची चुंबळ, तुळशी वृंदावन, साडीखण अशा २५ वस्तू तयार करून विक्री करतात.

साखरेची भांडी विशेष आकर्षण
मंगला गाडेकर या साखरेची भांडी सुद्धा तयार करतात. यात ताट, वाटी, पेला, तांब्या, घट, तुळशीचे वृंदावन या वस्तू साखरेपासून तयार करतात. या वस्तू सर्वांच्या आकर्षणाचा भाग ठरत आहे.

वस्तू अधिकाधिक आकर्षक व्हावी 
सुरवातीपासून कलेची आवड होती. त्यामुळे कोणतीही वस्तू तयार करतांना ती अधिकाधिक आकर्षक व्हावी असे वाटते. त्यातून हा व्यवसाय सूचला. आज दोघी मिळून हा व्यवसाय करतो. आम्ही तयार केलेल्या साहित्याला मागणी वाढत आहे.
- मंगला गाडेकर, गाडेकर गृहउद्योग, परभणी

 


परजिल्ह्यातही मागणी
आम्ही मागणी प्रमाणे वस्तू तयार करतो. आता आमचा उद्योग केवळ परभणी शहरापूरता मर्यादीत राहीला नाही. तर राज्यातील नागपूर, पुणे अश्या मोठ्या शहरातील लोकांची मागणी देखील होत असते.
- सारिका गाडेकर, गाडेकर गृहउद्योग, परभणी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT