मराठवाडा

Gandhi Jayanti : कापडात घ्या खादी...!

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद - तिकाटण्यावर लटकवलेल्या ढगळ कुर्ते आणि जाकिटांकडे पाहून अनेक वर्षे तरुणांचा एक मोठा वर्ग खादी कापडांपासून दूर राहिला. मात्र, आता तलम सुतापासून अगदी वुलन आणि रेशमापर्यंत सर्वच कापडांमध्ये खादीने आधुनिकता आणली आहे. त्यामुळे खादीची क्रेझ वाढण्यास मदत तर झालीच; पण राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सवलतीमुळे त्या दिवशी खादी भांडारात पाय ठेवायला जागा नसते, असे व्यवस्थापकांनी सांगितले.

‘‘कापडात घ्या खादी कापड,
तयात जादू असे.
राहतात ना कधी रिकामे,
या कपड्याचे खिसे.’’

असे आचार्य अत्रे यांनी उपहासाने म्हणून ठेवले असले, तरी खादी हा बहुतांशी नेत्यांचा आणि वृद्धांचाच पेहराव असल्याचा समज राहिला. पण आपण आश्‍चर्यचकित होऊ, इतके प्रकार खादीच्या सुती, रेशमी आणि लोकरी कापडांत आज आले आहेत. पूर्वी खादी खरेदी गांधी जयंतीपासून पुढे महिनाभर चालायची. कारण त्या काळात खादी कपड्यांवर सूट दिली जात असे. मात्र आता सवलतीच्या आमिषाने नव्हे, तर व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे म्हणून खादी वस्त्रांना प्राधान्य दिले जाते. खादीमधूनही नव्या फॅशनच्या अनुषंगाने कपडे बनायला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खादी वापरण्याचे आवाहन केल्याने परिवहन, रेल्वे आणि पोलिस खात्यात खादी उत्पादनांना महत्त्व आले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वर्ष १९६७ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे हे ५१ वे वर्ष आहे. नांदेडला मुख्यालय असलेल्या या समितीची नांदेडसह लातूर, उदगीर, उस्मानाबाद, उमरगा, बीड, परभणी, सेलू, हिंगोली, जालना आणि औरंगाबादला भांडारे आहेत. देऊळगाव राजाच्या संस्थानिकांच्या सराफ्यातील भव्य राजवाड्यातील खादी भांडारालाही आधुनिक रूप आले आहे. सिडकोत कॅनॉट गार्डन परिसरात खादी भांडार आहे.

देशी उत्पादनांचे आकर्षण
गावरान तूप, अस्सल मध, सुवासिक धूप-उदबत्ती, सागवानी लाकडाचे पार्टिशन, काठ्या, चामडी चपला-बूट, चामडी पर्स, पिशव्या, सुती मजबूत सतरंज्या, पितळी समया, दिवे, मूर्ती, ब्रांझ आणि व्हॉईट मेटलच्या मूर्ती, चंदणी हार, देशी तेले, साबणी, वॉलपीस, शिसवी-सागवानी देवघर, अशा नाना प्रकारच्या दर्जेदार वस्तूही खरेदी करण्यासाठी खादी भांडार विश्‍वासार्ह मानले जाते. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची आणि स्वदेशीची महती सांगणारी पुस्तकेही येथे विक्रीला ठेवली आहेत.

महिनाभर खास सवलत
महात्मा गांधी जयंतीपासून महिनाभर, म्हणजेच ता. दोन नोव्हेंबरपर्यंत खादी भांडारतर्फे कापडांवर २० टक्के सवलत आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवणारी खादी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी यावे, असे आवाहन सराफ्यातील खादी भांडारचे व्यवस्थापक ध. वि. राऊत यांनी केले.

महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त खादी भांडारतर्फे विक्रीत विशेष सवलत जाहीर केली आहे. खादीकडे लोक आकर्षित होत आहेत, हे खरे आहे. गेल्या वर्षात खादी ग्रामोद्योग समितीला ५६ लाख रुपये नफा झाला. यंदाचे लेखापरीक्षण सुरू आहे. 
-ना. वि. देशपांडे, अध्यक्ष, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT