ganesh temple
ganesh temple  sakal
मराठवाडा

Ganesh Temple : अंबडचा पुरातन सिद्धिविनायक गणपती

बाबासाहेब गोंटे

अंबड - शहरातील जागृत असा श्री सिद्धिविनायक गणपती ओळखला जातो. उभी मूर्ती हे या पुरातन गणपतीचे वैशिष्ट्य. गणेशोत्सवकाळात या देवस्थानात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरात असते.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

जुन्या शहरातील गणपती गल्लीच्या मुख्य रस्त्यावर सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. शहरातील भाविकांनी गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात गणरायांची पुरातन मूर्ती आहे. उभी मूर्ती, उजव्या बाजूला सोंड असे स्वरूप आहे. मानाचा गणपती म्हणून हे देवस्थान ओळखले जाते.

गणेश जन्मोत्सव, संकष्टी चतुर्थीला मंदिर परिसर भाविकांनी गजबजून जाते. या मंदिराची देखभाल सतीश देशपांडे करतात. मंदिरात नियमित महापूजा,अभिषेक,भजन, कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते.

गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या समयी प्रशासनातील अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथे महाआरती केली जाते. मंदिरात परिसरातील युवक गणेशोत्सव काळात येथे विविध धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम घेतात. गणपती गल्लीतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात दैनंदिन दर्शनासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात दिवसरात्र गर्दी असते.

दरम्यान, गणेशोत्सव काळात सिद्धिविनायक गणपती मंदिरात दैनंदिन कार्यक्रमात गणपती अथर्वशीर्ष पाठ, अभिषेक, भजन,कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसादाचे वाटप होणार आहेत. याशिवाय विविध सामाजिक, पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रम घेण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT