chor
chor 
मराठवाडा

परभणीत चोरट्यांची टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यातील वेगवेगळ्या चोऱ्या करणाऱ्या तीनचोरट्यांच्या टोळीला ताडकळस पोलिसांनी गुरुवारी (ता.सात) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती ताडकळस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने यांनी दिली.

ताडकळस (ता.पूर्णा) येथील चंद्रकांत किशनराव रुद्रवार यांच्या ट्रक्टरचे हेड चोरी केल्याबाबत ताडकळस पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ताडकळस येथील ओम कलेक्शन कापड दुकान फोडल्या बाबतही गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताडकळसचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने यांनी पथक तयार करून या चोरीचा तपास सुरु केला. या पथकात ताडकळस पोलिस ठाण्यातील कर्मचारी भारत तावरे, बाबासाहेब रोडे, माधव जंगम, धनंजय कनके यांचा समावेश होता.

या पथकाने आरोपीची माहिती काढून चोरी व घरफोडी करणारे आरोपी किशन उर्फ पप्पु गोविंदराव बईद (वय २३), निलेश उर्फ लल्लू नारायण जाधव (वय १९) व श्रीकृष्ण उर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा. बोबडे टाकळी, ता.परभणी) यांना शिताफीने अटक केली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही गुन्हे केले असल्याची कबुली दिली. चोरीस गेलेले ट्रक्टरचे हेड, कापड दुकांनातील कपडे असा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केला. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने यांनी दिली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी सायबर सेलचे कर्मचारी गणेश कौटकर व श्री. भुमकर यांचे सहकार्य लाभले.

तिघांवर आणखीही गुन्हे


ताडकळस पोलिसांनी अटक केलेल्या किशन उर्फ पप्पु गोविंदराव बईद (वय २३), निलेश उर्फ लल्लू नारायण जाधव (वय १९) व श्रीकृष्ण उर्फ शेंडी आश्रोबा बोबडे या तिन्ही आरोपींनी जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातंर्गत चोऱ्या केल्याची माहिती उघड झाली आहे. यात पूर्णा पोलिस ठाण्यातंर्गत दोन मोटारसायकल, दैठणा पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटारसायकल, परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटार सायकल, नवामोंढा पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटारसायकल, नानलपेठ पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटार सायकल, वसमत (जि.हिंगोली) पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटार सायकल, हट्टा (जि.हिंगोली) पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटार सायकल औंढा (जि.हिंगोली) पोलिस ठाण्यातंर्गत एक मोटार सायकल, तसेच हिंगोली पोलिस ठाण्यातंर्गत विविध चोऱ्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
 

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT