file photo 
मराठवाडा

Video : गंगाखेडच्या युवकाने केली ‘टच फ्री हँडवॉश’ मशीनची निर्मिती

प्रा. अंकुश वाघमारे

गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड शहरातील परभणी रोडवर असलेल्या रेणुका इंजिनिअरिंग वर्कशॉप येथे कुठलेही शिक्षण न घेता किशोर भारत चाफेकानडे या युवकाने केवळ आठ दिवसांत सार्वजनिक ठिकाणी उपयोगी पडणारी टच फ्री हॅंडवॉश मशीनची निर्मिती केली आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जगावर संकट आणले असून सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्यामुळे हा संसर्ग थोड्याफार प्रमाणात टाळला जाऊ शकतो. परंतु, आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणे भरपूर असल्यामुळे या ठिकाणी लोकांचा संपर्क जास्त प्रमाणात येतो. या गोष्टीचा विचार करूनच कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेतलेला युवक किशोर यांनी वडिलांच्या हाताखाली काम केल्याच्या अनुभवावर रेणुका इंजिनिअरिंग फेब्रिकेशन येथे केवळ आठ दिवसांत टच फ्री हॅंडवॉश मशीनची निर्मिती केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी  मशीनचा उपयोग
 या मशीनचा उपयोग शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी केल्या जाऊ शकतो. केवळ पायाने प्रेस केल्यानंतर या मशीनद्वारे हँडवॉश व पाणी ॲटोमॅटिक येत असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या नळास हात लावण्याची गरज नाही. या मशीनचा तीन व्यक्ती एकाच वेळेस उपयोग करू शकतात. सध्याच्या परिस्थितीत अशा नावीन्यपूर्ण टच फ्री हॅंडवॉश मशीनची निर्मिती गंगाखेडसारख्या ग्रामीण भागात झाल्यामुळे तालुकावासीयांकडून किशोर भारत चाफेकानडे यांचे कौतुक होत आहे.

आठ दिवसांत मशीनची निर्मिती
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व सार्वजनिक ठिकाणी हात लावण्याची येऊ नये, अशा बातम्या ऐकल्यानंतर मी विचार केला व केवळ आठ दिवसांत टच फ्री हॅंडवॉश मशीनची निर्मिती केली.
- किशोर चाफेकानडे, मशीन निर्माता, गंगाखेड.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

Maruti Suzuki Car Rate: मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार! ३० हजार रुपयांपर्यंत दरवाढ होणार; पण कधीपासून? जाणून घ्या...

GT vs CSK Live: साई सुदर्शन-शुभमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! यांच्याशी जो नडला, त्याला यांनी गाडला; IPL मधील सर्वात यशस्वी ओपनर्स...

Eknath Shinde Photo Removed Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांचे छायाचित्र हटविले; शिवसेना आक्रमक

GT vs CSK Live: शुभमन गिल Out असूनही मैदानावर उभा राहिला, चेन्नईचा तिथेच कार्यक्रम झाला; गुजरातच्या कर्णधाराने मोडले अनेक विक्रम

SCROLL FOR NEXT