gangapur rain update 482mm rain fall recorded weather farmer agriculture Sakal
मराठवाडा

Gangapur Rain News : गंगापूर तालुक्यात एकाच रात्रीत ४८२ मिमी पावसाची नोंद

ऊस तोडीसाठी बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

बाळासाहेब लोणे

गंगापूर : शहरासह तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. २६) दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यात एकाच दिवसात ४८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गंगापूर महसूल मंडळात सर्वाधिक ७३ मिमी पाऊस झाला. तसेच गंगापूर शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून अनेक गाळ्यांत पाणी साचले होते. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दामझाक उडाली.

आज दिवसभर खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला. दरम्यान, ऊस तोडीसाठी बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

जीवनावश्यक वस्तूही भिजल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणचा निवारा शोधावा लागला. तालुक्यात झालेल्या पावसानंतर आज पहाटेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग,

सोयाबीन अन्य पिकांची सुरू असलेल्या काढणीत व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी ठप्प झाली आहे. यात सर्वात मोठा फटका कांदा पिकाला बसला असून, कांद्याचे रोपेच उन्मळून पडले आहेत.

शहरात वीजगूल आणि नाल्या पॅक

शहरात मध्यरात्रीपासूनच विजेचा लंपडाव सुरू होता. पहाटेपासून पुन्हा वीज गेली. सकाळी नऊ वाजता वीज आली. पालिका प्रशासनाने गटारी स्वच्छ न केल्याने अनेक भागातील गटारी जाम झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अनेक सखल भागातील गाळयात पाणी सचण्याचा प्रकार झाला. त्यामुळे पालिका प्रशासनावर नागरिकांचा रोष वाढला आहे.

गंगापूर तालुक्यात झालेला पाऊस

  • गंगापूर : ७३

  • मांजरी : ६८

  • भेंडाळा : ३५

  • सी. वाडगाव : ३५

  • वाळूज : ५६

  • डोणगाव : ३५

  • शेंदूरवादा : ४९

  • हर्सूल : ६२

  • तुर्काबाद : ६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT