Ganja 
मराठवाडा

बीडमधील परळीत गांजाची सामुहिक शेती, दोघांना घेतले ताब्यात

परळीत पुन्हा चार जणांच्या शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

परळी (जि.बीड) : परळीत पुन्हा चार जणांच्या शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे पाच दहा ग्राम गांजावरून (Ganja) राज्यभर आरोप-प्रत्यारोप आरोप सुरू असताना बीड जिल्ह्यात चक्क गांजाचीची सामूहिक शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या परळी ग्रामीण पोलिसांनी 2 क्विंटलपेक्षा जास्त गांजा जप्त करत दोघांना अटक केली आहे. तालुक्यातील मोहा या गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे समोर आल्यानंतर शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता याच तालुक्यात (Crime In Beed) पुन्हा गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या मोहा या गावात जवळपास दहा ते बारा वर्षांपूर्वी अफूच्या लागवडीवरुन मोठी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी मोह्यातील अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर या आठवड्यात ग्रामीण पोलीसांनी धाडसी कारवाई करत बुधवारी (ता.२७) तालुक्यातील गुट्टेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब दत्ता गुट्टे यांच्या तुरीच्या शेतातील पिकात सात गांज्याची झाडे लावण्यात आली होती. या शेतात छापा टाकून ती जप्त करण्यात आली. या झाडांचे वजन १ क्विंटल ७ किलो असून बाजार भावानुसार ४ लाख २८ हजार रुपये किंमतीची ही झाडे असून सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या फिर्यादीवरुन भाऊसाहेब गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२९) सकाळी ग्रामीण पोलीसांनी पुन्हा तालुक्यातील हेळंब येथील एका शेतकऱ्याच्या शेतात छापा टाकला असून ग्रामीण पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT