aundha nagnath
aundha nagnath 
मराठवाडा

रथोत्सवात गुंजला ‘हर हर महादेव’चा जयघोष 

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथः ‘हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ  महाराज की जय’च्या जयघोषांमध्ये मंगळवारी (ता. २५) रात्री दहा वाजता महाशिवरात्रीनिमित्त येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात आला. 

 श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या वेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गर्दी होती. फुलांच्या माळा आणि दिव्यांद्वारे सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथाची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. 

या रथाने रात्री दहा वाजेच्या सुमारास मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यास सुरवात झाली. या वेळी उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय, बम बम भोले’चा गजर केला. १९४८ मध्ये झालेल्या घटनेमध्ये तीन जण हुतात्मा झाले होते. यात गणपत ऋषी, शंकर पाठक, रंगनाथ सुरवाडकर यांना तसेच सन २०११ मध्ये सतीश पाठक यांचे रथ मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते. त्यांनाही या वेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.

देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची पूजा 

 दरम्यान, देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, नगराध्यक्षा विजयमाला मुळे, उपनगराध्यक्षा वच्छलाबाई देशमुख यांच्यासह सहसचिव विद्याताई पवार, विश्वस्त गणेश देशमुख, डॉ. पुरुषोत्तम देव, आनंद निलावार, प्रा. देविदास कदम, डॉ. किसन लखमावार, डॉ. विलास खरात, गजानन वाखरकर, ॲड. मुजाभाऊ कदम, शिवाजी देशपांडे, प्रा. पंजाब गव्हाणकर, रमेश बगडिया, ॲड. संभाजी कदम, पुजारी रवी भोपी, नगरसेवक राम कदम, बाळासाहेब साळवे, मनोज देशमुख आदींसह जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. 

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

रथ फिरवताना भजनी मंडळ व बँडपथक तसेच नागेश्‍वर शाळेमधील विद्यार्थी ढोल-ताशांसह सहभागी झाले होते.  रथ उत्सवप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी अब्दुल गणी खान यांच्यासह पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यांचीही उपस्थिती

या वेळी अनिल देशमुख, दत्ता शेगूकर, बाळासाहेब देशपांडे, प्रमोद देव, संजय पाठक, विष्णू जाधव, रामभाऊ मुळे, कृष्णा ऋषी, अनिल शिंदे, श्रीपाद दीक्षित, डॉ. राम जयस्वाल, गगाधर देवकते, सुरजीतसिंह ठाकूर, निळकंठ देव, बापूराव देशमुख, शंकर काळे, कृष्णा पाटील, आनिल देव, अनिल पाठक, लक्ष्मण सोनटक्के, नागेश माने, गजानन वाशीमकर, विलासराव काचगुडे, गगाधर देवकते, अनिल पाटील, प्रल्हाद पोपळघट आदींची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT