dharashiv  sakal
मराठवाडा

Dharashiv News : शेतकऱ्यांना पीकविम्याचे २९४ कोटी मिळवून द्या ; आमदार कैलास पाटील यांची कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे मागणी

कृषी आयुक्त गेडाम यांची भेट घेवून मागील वर्षीच्या पीक विम्याचे निम्मेच वाटप झाले आहे. उर्वरित रक्कम कंपनीने दाबून ठेवली आहे. त्यामुळे तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी लेखी मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कळंब : मागील खरीप हंगामातील पीक विम्याचे २९४ कोटी रुपये शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. राज्यस्तरीय तक्रार समितीने दिलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी कृषी आयुक्त प्रविण गेडाम यांच्याकडे केली आहे.आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसांचे संदर्भही दिले आहेत.

कृषी आयुक्त गेडाम यांची भेट घेवून मागील वर्षीच्या पीक विम्याचे निम्मेच वाटप झाले आहे. उर्वरित रक्कम कंपनीने दाबून ठेवली आहे. त्यामुळे तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी लेखी मागणी केली आहे. २०२२ च्या पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी पिके संरक्षित केली.

विमा कंपनीने असमान पद्धतीने दिलेल्या पीकविम्याची रक्कम वाढवून देणे, अपात्र करण्यात आलेल्या पुर्वसूचनांबाबत विमा कंपनीला आदेश देण्यासाठी ८ फेब्रुवारीला आमदार पाटील यानी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. विभागस्तरीय बैठकीत कंपनीने ५०/५० टक्के भारांकन न लावता पंचनाम्यातील क्षेत्र व टक्केवारीनुसार नुकसान भरपाई वितरीत करावी, पुर्वसूचनांच्या पंचनाम्याच्या प्रती ८ मार्च २०२३ पर्यंत कृषी विभागास उपलब्ध करुन द्याव्यात. तोपर्यंत प्रती उपलब्ध न केल्यास विमा कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला होता.

कंपनीमार्फत प्रत्यक्ष पाहणी न करता १ लाख ३४ हजार ३२८ नाकारण्यात आलेल्या पुर्व सूचनांची प्रत्यक्ष पाहणी करुन कार्यवाही करणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना २९४ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या बैठकीत भारतीय कृषि विमा कंपनीस उर्वरित ५० टक्के रक्कम वितरीत करावी, असे आदेश दिले होते. २४ ऑगस्ट २०२३ रोजी अप्पर मुख्य सचिव (कृषी) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली.

तिथेही तेच मुद्दे उपस्थित झाले. अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. कंपनीवर जिल्हाधिकारी यांनी महसुल वसुलीच्या ३ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखवत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे कृषी आयुक्तांनीच यामध्ये लक्ष घालुन विम्याची २९४ कोटी रक्कम द्यावी. विलंबाच्या कारणाचा खुलासा मागवावा, कार्यपुर्तता अहवाल सादर करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'हा' रस्ता २०२७ पर्यंत बंद; कोणत्या वेळेत वाहतूक सुरू राहणार?

Latest Marathi News Live Update : NEET UG परीक्षा फुटीप्रकरणात मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांना १० दिवसांची कोठडी

Narendra Modi: जर युद्ध संपलं नाहीतर सर्व गमावून बसू; ऊर्जा संकटावर नरेंद्र मोदींची जगाला इशारा, जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त

"आम्ही एकमेकींच्या दुष्मन नव्हतो पण इंडस्ट्रीतील.." सोनाली-अमृताने अखेर भांडणाविषयी सोडलं मौन

Religious Tourism: शिवना येथील श्री शिवाई देवी संस्थानसह जिल्ह्यातील सात मंदिरांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

SCROLL FOR NEXT