jalkot nuksan.jpg
jalkot nuksan.jpg 
मराठवाडा

२७ गावातील शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी ! घोणसी मंडळाचे विदारक चित्र ! 

विवेक पोतदार

जळकोट (लातूर) : तालुक्यातील घोणसी महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनसह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्यासह अधिकार्यांनी पाहणी करत बुधवारी (ता.२३) पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वेक्षण व पंचनामे सुरु झाले आहेत.  

घोणसी महसूल मंडळातील गुत्ती, तिरुका, अतनूर ,डोंगरगाव , बोरगाव , खंबाळवाडी , चिंचोळी, धोंडेवाडी , मेवापूर , शिवाजीनगर तांडा , आदी गावात सलग दोन दिवसातील मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून रस्ते, नाले, कालवे तडुंब भरले होते. पूरामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तातडीने तहसिलदार संदीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी कसाबसा सावरलेल्या अवस्थेत असताना या पावसाने नुकसान पुन्हा आशा आकांशावर पाणी फेरले आहे. हाती आलेल्या सोयाबीन पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. 

या पावसानंतर बुधवारी (ता.२३) उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, कृषी अधिकारी आकाश पवार, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, मंडळ अधिकारी तथा तलाठी विश्वास धुप्पे तसेच संबंधीत गावचे तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी यांनी तात्काळ नुकसान झालेल्या या महसूल मंडळातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पहाणी केली. सर्व ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. कालपासून सर्वेक्षण व पंचनामे सुरु असल्याची माहिती तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी दै. सकाळशी बोलताना दिली.

घोणसी मंडळात १२२ मिलीमीटर पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी पाहणी करुन पंचनाम्याचे आदेश दिले. तर ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक दोन दिवसापासून प्रत्यक्ष सर्वेक्षण पंचनामे करत आहेत. येत्या सोमवारी (ता.२८)  अहवाल द्यायचा आहे. - आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT