file photo 
मराठवाडा

विशेष बातमी : पाकिस्तानातून आलेली गीता सध्या परभणीत घेतेय सांकेतिक भाषेचे शिक्षण

गणेश पांडे

परभणी ः पाकीस्तानमधून आपल्या कुटूंबाच्या शोधार्थ भारतात आलेली गीता सध्या परभणी येथे सांकेतिक भाषेचे शिक्षण घेत आहे. पहल या संस्थेचे अनिकेत सेलगावकर यांच्याकडे ती सध्या राहत असून गेल्या तीन महिण्यापासून ती परभणीत वास्तव्यास आहे. पुढील तीन - चार महिण्यात ती सांकेतिक भाषेचा कोर्स पूर्ण करेल असा विश्वास पहल संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

पाकीस्तानमधून आलेल्या मुकबधिर गीताचे आपण पालक असल्याचा दावा जिंतूर येथील एका कुटूंबाने केला आहे. या दाव्यानंतर गीतासह संपूर्ण टीम जिंतूर येथे गेली होती. तेथे वाघमारे कुटूंबियांची भेट घेवून पडताळणी करण्यात आली. पंरतू गीताला त्या कुटूंबाबाबत काहीही आठवत नसल्याने गीताने त्यांच्याकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे डीएनए चाचणी नंतरच गीताला वाघमारे कुटूंबियांकडे दिले जावे असा निर्णय पहलच्या टीमने घेतला होता.

गीता शिकतेय सांकेतिक भाषा

सध्या गीता ही परभणी येथे अनिकेत सेलगावकर यांच्या पहल संस्थेमध्ये वास्तव्यास आहे. त्या ठिकाणी गेल्या तीन महिण्यापासून ती सांकेतिक भाषेचा सराव करत आहे. स्वता अनिकेत सेलगावकर हे गीताला सांकेतिक भाषा शिकवत आहेत. गीताला व्यवहारी ज्ञान मिळावे, तीला स्वताचे बॅंक खाते काढता यावे व तीला स्वाक्षरी देखील करता यावी यासाठी पहल संस्था प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयानंतरच पुढे विचार

गीताला पाकीस्तानमधून भारतात आणण्यासाठी तत्कालिन परराष्ट्र मंत्री (कै.) सुषमा स्वराज याचे मोठे योगदान लाभले. सध्या तीची संपूर्ण माहिती ही परराष्ट्र मंत्रालयाकडेच आहे. तीला भारतीय नागरीकत्व देखील मिळाले आहे. परंतू कुटूंबाचा शोध घेत असतांना तीची फसवणुक होऊ नये यासाठी परराष्ट्र मंत्रालयासह पहल संस्था देखील काळजी घेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडे गीतासह तीचे कुटूंब असल्याची दावा करणाऱ्यांची डीएनए चाचणी पूर्ण झाल्याशिवाय पुढे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही अशी माहिती पहल संस्थेचे अनिकेत सेलगावकर यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT