Farmers News, Latur 
मराठवाडा

शेतात गांजा लावू द्या, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बाबासाहेब उमाटे

देवणी (जि.लातूर) ः हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. धनेगाव प्रकल्पात दीड दशकापूर्वी एक हेक्टर शेती गेली अन् त्याचा मोबादला अद्यापही मिळाला नाही. या उद्वेग्नतेतुन दारुच्या दुकानातून अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुण व अविवाहित तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धनेगाव (ता.देवणी) मांजराकाठचे समृद्ध गाव. धनेगाव बँरेजमुळे गावाची ओळख जिल्ह्यासह सर्वच भागात झाली. याच गावातील जयंत धोंडीराम पाटील यांची दीड दशकापूर्वी धनेगाव बँरेजमध्ये शेती गेली आहे. अद्यापही त्यांना मावेजाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. शिल्लक एक हेक्टर क्षेत्रातुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण. त्यातच गेल्या दोन महिन्यापासुन सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यातुन अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या संतापातून त्यांनी गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.

सध्या कोरोनाच्या महामारीतुन हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. दारु दुकाने उघडी ठेऊन संरक्षित अंतर राखण्याचे व नियमाचा फज्जा उडाला. दारुने शासनाच्या तिजोरीला हातभार लागणार असेल तर मग गांजा लागवडीस परवानगी दिल्यास शासनाच्या महसुलात वाढही होईन आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. गेल्या पाच वर्षांपासुन तालुक्यासह सीमाभागात दुष्काळसदृश्‍य स्थिती आहे. त्यामुळे शेतीत केलेला खर्चही भरुन निघत नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी दिली तर शेतीच्या उत्पन्नातही वाढ होईल व शासनाचा महसुलही वाढण्यास मदत होईल अशी मागणी जंयत पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



गांजाचा वापर भारतीय उपखंडात चार हजार वर्षापासुन होत आहे. शिवाय गांजा या वनस्पतीस आयुर्वेदिक महत्त्व आहे. पुराण काळात याचा उल्लेखही आढळतो. उत्तर भारतात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड व व्यसनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. एक एकर गांजाची लागवड केल्यास त्यातुन एक टन जरी उत्पादन झाले तरी सध्याच्या जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. १९८५ पूर्वी गांजाची लागवड आपल्याकडे सुरु होती. मात्र त्यानंतर कायद्याच्या चौकटीत आणुन त्यावर बंदी आणण्यात आली आहे.
- जंयत पाटील, धनेगाव
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला, सात महिन्यांची थकबाकीही मिळणार

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी

IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Marathi News Live : PM CARES Fund चा लेखापरीक्षण अहवाल सरकारकडून सार्वजनिक

Mangalwedha News : मंगळवेढ्यात धनश्री मल्टीस्टेटने गाठला 1500 कोटी ठेवींचा टप्पा

SCROLL FOR NEXT