Milk Rates esakal
मराठवाडा

chhatrapati Sambhajinagar : दूध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रूपये अनुदान द्या; काँग्रेसचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (ता. पाच ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. काळे म्हणाले, की दूध उत्पादन खर्च वाढत असताना, दुधाचे भाव मात्र कमी होत आहेत. पशुखाद्य तसेच जनावरांच्या औषधोपचाराचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे.

तसेच अतिवृष्टी व गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणीही डॉ. काळे यांनी यावेळी केली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

आंदोलनात किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, संतोष शेजूळ, सागर नागरे, दीक्षा पवार, जमील पटेल, सुरेश शिंदे, पुंडलिक जंगले, शिवाजीराव ढाकणे, नीलेश आंबेवाडीकर, विजय कांबळे, अभिषेक शिंदे, सदाशिव विटेकर, प्रभाकर वाघ आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

Career Horoscope: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT