NND15KJP01.jpg 
मराठवाडा

भाजीपाला विक्रेत्यांना विक्रीस्थळ द्यावेत

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाने लॉक डाऊन घोषीत केल्यानंतर शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रात स्थळ निश्चित करुन द्यावते, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळून नागरिकांनाही भाजीपाला मिळेल, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणुमंत पाटील राजेगोरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे
कोरोना विषाणूजन्य रोगामुळे संपूर्ण देशात संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण बंद पाळण्यात येत आहे. या कालावधीत शहरांना अत्यावश्यक सेवा म्हणून फळे व भाजीपाला यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला माल आज सर्व बाजारपेठ बंद असल्यामुळे जागेवर खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

शेतकऱ्यांना ओळखपत्र द्यावे
जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट स्वतः शासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार व सर्व संसर्ग टाळण्याचे सर्व नियम पाळून बाजारात फळे व भाजीपाला आणून विकण्यास इच्छुक आहेत. त्या संबंधी शासनाने शेतकऱ्यांना माल आणून विकावा असेही आवाहन केले आहे. आज फक्त काही ठराविक ठिकाणीच बाजार भरत असून त्यामुळे त्याठिकाणी खूप गर्दी होत आहे. त्यामळे पोलीस प्रशासन गर्दी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. ही टाळन्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्या मार्फत शेतकऱ्यांना ओळख देण्यात यावे व महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विक्री स्थळ उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. 

वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण   
कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 842 180 0099 असा आहे.

मालवाहूकदारांनी संपर्क करण्याचे आवाहन
अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिमा तपासणी नाके देगलूर, बिलोली आणि सिमा तपासणी केंद्र भोकर यांच्याकडून वाहतूक प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व मालवाहूकदारांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावा. त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. संचारबंदीमुळे ज्या वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या mh26@mahatranscom.in या ई-मेलवर वाहन क्रमांक नमूद करुन अर्ज केल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT