file photo 
मराठवाडा

यामुळे लागतोय लहान वयातच चष्मा

जगन्नाथ पूरी

सेनगाव ( जिल्हा हिंगोली)  : जिल्‍ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह बालकांमध्ये अन्ड्राईड बाईलची क्रेझ निर्माण झाल्‍याने तरुणांना कमी वयातच डोळ्यावर परिणाम होवू लागला आहे. विशेष म्‍हणजे लहान मुलांच्‍या डोळ्यावर गंभीर परिणाम होत असल्‍याचे चित्र आहे.

जिल्‍ह्यात अन्ड्राईड मोबाईल वापरण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान बालकांसह ज्‍येष्ठ नागरिकांमधून अन्ड्राईड मोबाईल वापरला जावू लागला आहे. दैनंदिन गरजांमध्ये अन्ड्राईड मोबाईलने आपले स्‍थान निर्माण केल्‍याचे चित्र दिसू लागले आहे. कमी किमतीत अन्ड्राईड मोबाईल मिळू लागल्‍याने गावपातळीवर सर्वांकडे या मोबाईलची रिंगटोन वाजू लागली आहे.


दरम्‍यान, ज्‍येष्ठ नागरिकांसोबत तरुणांचे अनुकरण लहान बालके करू लागली आहेत. मोबाईलवर गेम खेळण्यात बालके मग्‍न होवू लागली आहेत. लहान बालके सहजपणे मोबाईल हाताळत असल्‍याचे कौतूक आई वडिलांना असले तरी त्‍याचे गंभीर परिणाम मात्र बालकांना भोगावे लागत आहेत. मागील काही दिवसात लहान बालकांमध्ये चष्मा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे आता पालकांनीच सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

तज्ज्ञ म्हणतात...
तरुणांसह ज्‍येष्ठ मंडळी अन्ड्राईड मोबाईलकडे आकर्षित झाली आहे. त्‍याचे अनुकरण लहान बालक व विद्यार्थी करू लागले असून मोबाईल स्‍क्रीनच्‍या प्रकाशाचा डोळ्यावर विपरित परिणाम होवू लागला आहे. कमी वयातच चष्मे लागत असून या प्रकाराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्‍य अधिकारी

लहान बालकांना प्रेम व हट्टापोटी गेम खेळण्यासाठी अन्ड्राईड मोबाईल दिले जातात. याची सवय बालकांना लागत आहे. वर्षभरात मोबाईलच्‍या अतिवापरामुळे जवळपास पंधरा बालकांच्‍या दृष्टीवर परिणाम झाला आहे. या बालकांना चष्मे लागले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलपासून दूर ठेवणे गरजेचे झाले आहे. - जी.एच. सरकटे, कृष्णा ऑप्‍टिकल, सेनगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT