मराठवाडा

दिव्यांच्या रोषणाईने उजळला गोदावरी घाट

सकाळ वृत्तसेवा


नांदेड ः मागील पंधरा वर्षापासून सुरु असलेल्या गोदावरी गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी रात्री गोदावरी नदीच्या नगीना घाटावर हजारो महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महिलांनी परिवारातील सदस्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करुन हजारो दिवे प्रज्वलीत करुन गोदावरीचा नगीना घाट दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकला. नदी तटावरील हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नांदेडकरांनी गर्दी केली होती.

त्रिपुरारी अर्थात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त ॲड. दिलिप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. घाटावर गर्दी होणार असल्याने पुजेसाठी आलेल्या महिलांना गोदावरीच्या नगीना घाटावर वेळेवर येऊन शिस्तीत बसण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यासाठी महिलांना बक्षिस देण्यात येणार होते. त्यानुसार दीड हजारापेक्षा अधिक महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

त्यानंतर भाजपा पदाधिकारी, लायन्स क्लबचे सदस्य, द्वारका, नेपाळ व गंगासागर यात्रेला जाणारे भाविक, माध्यम प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित हजारो महिलांना दिवे, द्रोण व फुलांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. सालासार भजन मंडळाचे गिरीराज लोया व व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच आरत्यांचे गायन केले.
त्यानंतर महिलांनी आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्याची प्रार्थना करुन प्रज्वलित दिवे नदीपात्रात सोडल्याने गोदावरीचे पात्र रोषणाईने उजळुन निघाले होते. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नगीना घाट परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

संस्कार भारतीच्या सदस्यांनी काढलेल्या रांगोळीचे कौतुक करण्यात आले. महापालिकेतर्फे सुभाष कुकडे व त्यांच्या जीवरक्षकांनी कामगिरी बजावली. मारवाडी युवा मंचतर्फे मसाला दूध वाटप करण्यात आले. गुरुद्वारा लंगर साहबतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

तत्पूर्वी गोदावरी माता, प्रभू रामचंद्र व गुरूनानकजी यांच्या प्रतिमेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजक दिलीप ठाकूर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक आहे. या वेळी मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश जयस्वाल, लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विजय भारतीया, आमदार राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, लंगर साहिब गुरुद्वाराचे बाबा हरीसिंघजी, शंतनू डोईफोडे, नरसिंह ठाकूर आदींची उपस्थिती होती.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT