file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात कोरोना लसीकरणाची सुवर्ण अक्षरांनी नोंद- रुचेश जयवंशी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारपासून शनिवार (ता. १६)  सुरु झालेल्या कोरोना लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गित्ते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. प्रेमकुमार ढोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे तालुक आरोग्य अधिकारी डॉ. सतिश रुनवाल, डॉ. नामदेव कोरडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना या साथरोगाला लढा देण्यासाठी रणनीती तयार

जिल्हाधिकारी जयवंशी यावेही म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना प्रादूर्भावाबाबत हिंगोली जिल्हात सर्वप्रथम १४ फेब्रुवारी, २०२० रोजी जनजागृतीपर सभा घेण्यात आली. या सभेत  कोरोना या साथरोगाला लढा देण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. या रणनितीचा आजचा पुढचा टप्पा म्हणजे ही लसीकरण मोहिम असून प्रशासनाने योग्य नियोजन करुन आखलेली रणनीती यशस्वी होतांना दिसत असल्याने समाधान लाभत आहे.

आरोग्य विभागाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत केली

जिल्ह्यात कोरोना या साथरोगाविरुध लढा देतांना प्रत्येक विभागाचे योगदान हे खुप मौल्यवान असून आरोग्य विभागाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत केली. त्यांचे योगदान हे अमुल्य आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या कर्माचाऱ्यांना लसीकरण करुन या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन

तसेच जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समान समावेश या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी म्हणाले तसेच  या लसीकरण मोहिमेची माहिती देतांना म्हणाले की, जिल्ह्यात लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यास एकूण सहा हजार६५० लसींचे डोस प्राप्त झाले असून याद्वारे एकूण तीन हजार ३३२ कोव्हिन ॲप’वर नोंद केलेल्यांना पहिल्या टप्पयात लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन

हिंगोली जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारीका महाविद्यायात आयोजित आरोग्य विभागातील १०) कर्मचारी तर उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी येथे आयोजित आरोग्य विभागातील १०० कर्मचारी असे एकुण २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणाविषयी कसलिही भिती न बाळगता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन ही यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी लसीकरण मोहिमे विषयी म्हणाले प्रथम कोरोना लसीकरण पुर्व तपासणी कक्ष त्यानंतर नोंदणी कक्ष प्रत्यक्षात लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष या प्रमाणे विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.  यावेळी मोहिमेची प्रथम लस वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे यांना देण्यात आली. तर शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या  रमा गिरी यांना प्रथामिक स्वरुपात दुसरी तर महिलांमध्ये प्रथम लस देण्यात आली.

लसीकरणाचे पहिले लाभार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे

यावेळी लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नसून स्वत:ला स्वरंक्षीत वाटत असुन सर्वांनी ही लस घेवून स्वत: आणि इतरांना संरक्षीत करावे असे आवाहन केले.सेल्फी स्टॅंडचे उद्घाटन यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते मी कोरोनाची लस घेतली तुम्ही ही घ्या या सेल्फी स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT