file photo 
मराठवाडा

९० दिवसांत नऊ हजारांवर ‘गूड न्युज’ !

कैलास चव्हाण

परभणी  : लॉकडाउनमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असल्याने सर्वच घटकाला त्याची झळ बसली असताना एक सुखद धक्का मातृत्वाची ओढ असणाऱ्या महिलांना बसला आहे. लॉकडाउन होण्याआधीच्या काळापेक्षी लॉकडाउनमध्ये गरोदर मातांची नोंदणी कमालीची वाढली आहे. तब्बल नऊ हजार ७१८ गरोदर मातांची नोंदणी मार्च ते मे महिन्यात झाली असून पाच हजार ६५२ प्रसूतीदेखील याच कालावधीत झाल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाल्याने तब्बल तीन महिने सर्व व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालय, अस्थापना बंद राहिल्याने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळच वेळ मिळाला. लॉकडाउनचे अनेक नफे-तोटे समोर येत आहेत. अनेक दिवसांपासून कुटुंबापासून, गावापासून दूर झालेली माणस एकत्र आली. नात्यातील जिव्हाळा वाढला, खर्च कमी झाला. आरोग्य सुधारले. कुणाच्या घरात कौटुंबिक नाते घट्ट झाले, तर कुणाच्या घरात चिडचिडपणा वाढून लहानसहान गोष्टीवरून कुरबुऱ्या वाढल्या होत्या. तर कुणामध्ये प्रेमाचा उमाळा दाटून आला.

चार हजार ८३८ मातांची प्रसूती

लॉकडाउन काळातदेखील आरोग्य विभागाचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान, घेतलेल्या नोंदीत लॉकडाउन काळात मार्च ते मे महिन्यात महिलांत गरोदर राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यांत तब्बल नऊ हजार ७१८ महिलांनी गरोदर असल्याची नोंद केली आहे. गरोदर मातांसोबतच लॉकडाउनमध्ये प्रसूती झालेल्या महिलांची संख्यादेखील मोठी आहे. तीन महिन्यांत पाच हजार ६५२ महिलांची प्रसूती झाली आहे. या बाबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सहा हजार ४७७  गरोदर मातांची नोंदणी झाली होती. तर चार हजार ८३८ मातांची प्रसूती झाली आहे.

लसीकरणात खंड नाही
गरोदर माता आणि लहान बालकांच्या लसीकरणात लॉकडाउनमध्ये कोणताही खंड पडू न देता आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. मार्च महिन्यात १८ हजार ९००, एप्रिल-१७ हजार ३५३, मे महिन्यात १९ हजार १८७ असे लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिकांनी कमालीचे धैर्य दाखवत सेवा बजावली आहे.

मार्च ते मेमधील नोंदणी व प्रसूती

तालुका    गरोदर माता नोंदणी        प्रसूती
गंगाखे़ड -   १,१३८                  ५१२
जिंतूर  -   १,७४२                    ८३८
मानवत -  ५२४                      १९०
पालम -  ५०५                         १९०
परभणी-  २,९०८                    २,७१३
पाथरी -  ८४०                       ३७१
पूर्णा -    ८७९                        २६०
सेलू   -  ७३०                        ४३३
सोनपेठ  - ४५२                       १४५
एकूण  -   ९,७१८                      ५,६५२
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

Latest Marathi News Live Update: यूपीआयवरील चार्जेस दिवाळीनंतर लागू होणार

SCROLL FOR NEXT