Hingoli photo 
मराठवाडा

आनंदाची बातमी : हिंगोलीतील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात एकमेव कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाचा उपचारानंतर १४ दिवसानंतर घेतलेला दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना संशयिताचा तपासणी अहवाल दोन एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग कोरोनाबाबात दक्ष होत रुग्णांवर उपचार सुरू केले होते. 

हिंगोलीकरांना दिलासा 

१४ दिवस उपचार केल्यानंतर घेण्यात येणाऱ्या थ्रोट स्वॅब नमुना अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर गुरुवारी दुसरा तपासणी अहवालही निगेटिव्ह आला असून हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे. 

थ्रोट स्वॅब येणे प्रलंबित

दरम्यान, हिंगोलीतील आयसोलेशन वार्डात कल्याण येथून आलेल्या ११ व पुणे येथून आलेल्या दोन जणांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच वसमत येथील शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये ११ जणांवर उपचार करण्यात येत असून या अकरा जणांचा थ्रोट स्वॅब येणे प्रलंबित आहेत. 

क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार

येथे औरंगाबाद येथून आलेले सात, पुणे येथून दोन व अहमदनगर आलेल्या दोन जणांचा समावेश आहे. दरम्यान, बाहेरील जिल्ह्यांतून हिंगोली जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे. बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तींची माहिती नजीकच्या आरोग्य संस्थेस देऊन त्या व्यक्तीस १४ दिवस शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

मोठ्या शहरांतून आलेल्यांची आरोग्य तपासणी करा

हिंगोली : हिंगोली व सेनगाव तालुक्‍यात मुंबई, पुणे या मेट्रो सिटीत कामानिमित्त गेलेले गावकरी बुधवारी (ता.१५) गावी परतले आहेत. त्‍यांच्या आरोग्याची तपासणी करावी, अशी मागणी लोकसभेचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख रमेश शिंदे यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विविध गावांचा समावेश

हिंगोली व सेनगाव तालुक्‍यातील काही गावकरी कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेले होते. त्यातील बहुतांश बुधवारी (ता.१५) दुचाकीने गावी परतले आहेत. यात उमरा, काळकोंडी, वैजापूर, पांगरी, पातोंडा या गावाचा समावेश आहे. 

व्यवस्था करण्यास गावकरी तयार

त्‍यांची कोरोना तपासणी करून त्‍यांना १४ दिवस गावापासून बाहेर राहण्याची व्यवस्‍था करावी, त्‍यांच्या भोजनाची व्यवस्‍था नरसी सर्कलचे गावकरी करण्यास तयार आहेत. तसेच तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेऊन मेट्रो सिटीतून आलेल्या सर्व गावकऱ्यांची कोरोना तपासणी करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांवर जणूकाय देवाचीच कृपा! बोलतील ते होतं खरं, यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना बसतो मोठा फटका

SCROLL FOR NEXT