download  
मराठवाडा

नाट्यकर्मींसाठी खुषखबर, नवीन नाट्यगृहाचे काम पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे थंडावलेल्या नवीन नाट्यगृह इमारतीचे काम पुन्हा गतीने सुरू झाले आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने येथे मंजुर असलेल्या नाट्यगृहाच्या जागेचा व निधीचा प्रश्न सुटला. 

साधारण वर्षभरापूर्वी सुसज्ज अशा नाट्यगृहाचे काम जोमाने सुरू झाले; परंतु मार्च महिन्यात कोरोनाचा या कामावरदेखील परिणाम झाला व गेले दोन-तीन महिने काम बंद ठेवावे लागले. परंतु, अनलॉक-एकपासून पुन्हा या कामाला सुरवात झाली आहे. शहरातील नटराज रंगमंदिर गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असून, येथील संपूर्ण सुविधा मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे रसिकांना नव्या नाट्यगृहाची प्रतिक्षा लागली आहे. लवकरच हे काम पुर्ण झाल्यास परभणीकरांची सांस्कृतिक भूक भागणार आहे. 

इमारत दोन मजली 
आता या पिलर उभारणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. नवीन नाट्यगृहाची इमारत दोन मजली असून, तळमजल्यावर पार्किंगची सुविधा आहे. तर येथे सुसज्ज एक हजार आसनक्षमतेच्या या नाट्यगृहात कलावंतांच्या विविध प्रदर्शनासाठी दालनदेखील राहणार आहे. साधारण या नाट्यगृहावर १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. बहुतांश निधी पालिकेला प्राप्त झालेला आहे. तसेच शहरातील विविध विकासकामे सुध्दा लवकरच पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करित आहे.  

नटराज रंगमंदिराला निधी मिळेना 
येथील नटराज रंगमंदिर गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असून, येथील संपूर्ण सुविधा मोडकळीस आलेल्या आहेत. नाट्यगृहाच्या दुरुस्ती, जीर्णोद्धारासाठी तीन ते चार कोटींची गरज आहे. महापालिकेने अनेक वेळा हा निधी मिळवण्याचा, कर्ज काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही. परभणीची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करण्याचा या रंगमंदिराचा वाटा असून, अनेक नटश्रेष्ठांनी या मंदिरात आपल्या कलांचे सादरीकरण केले आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेले हे रंगमंदिर नाट्यकर्मी, रसिकश्रोत्यांच्या प्रतीक्षेत आहे. 


(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT