plasma 
मराठवाडा

Good News ; प्लाझ्मा थेरपीची आज परभणीत शक्यता.... 

गणेश पांडे

परभणीः दिल्ली येथील अन्न व औषध प्रशासनाची (ता.३१) ऑगस्ट रोजी मान्यता मिळताच उद्‍घाटनाचे सोपस्कर न पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयाने कोरोनाबाधित गंभीर रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्याची तयारी सुरू केली असून ‘ओ’ पॉझिटिव्ह गटाच्या दात्याचा शोध घेतल्या जात आहे. शुक्रवारी (ता.चार) ही थेरपी केली जाण्याची शक्यता असून या पद्धतीने उपचार घेणारा तो पहिला रुग्ण ठरणार आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेट्रो रक्तपेढीने तीन वर्षांपूर्वी त्यासाठीच्या रक्तघटक वेगळे करणाऱ्या स्वयंचलित ॲफेरेसीस यंत्राची मागणी नोंदवली होती. कोरोनाच्या निमित्ताने हे यंत्रदेखील महिनाभरापूर्वीच रक्तपेढीत कार्यान्वित करण्यात आले; परंतु ही उपचारपद्धती सुरू करण्यासाठी दिल्ली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मान्यतेची गरज होती. त्यासाठी मोठा कालापव्यय झाला. अखेर (ता.३१) ऑगस्ट रोजी त्यास मान्यता मिळाल्याचा ई-मेल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. 

प्लाझ्मा दात्यांची सामाजिक जाणीव महत्त्वाची 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तीन हजारांचा टप्पा गाठला आहे. या संसर्गाने आतापर्यंत १२० पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला आहे. त्यावर एक हजारापेक्षा अधिक रुग्णांनी मात केली असली तरी उपचार घेणाऱ्यांची संख्या पंधराशेपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असून खऱ्या अर्थाने त्यांना प्लाझ्मा थेरपीची गरज आहे. जिल्हा प्रशासन, रुग्णालय प्रशासनाकडून अशा दात्यांना आवाहन केले जात आहे. त्यापेक्षाही आपण कुणाचा तरी जीव वाचवू या सामाजिक जाणिवेतून या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे. 

मेट्रो रक्तपेढीत धावपळ सुरू 
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेट्रो रक्तपेढीत पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. प्लाझ्मा दात्यांसह रुग्णाकडून तांत्रिक बाबींनी मंजुरी घेण्यासाठी कागदपत्रांची छपाई व विविध चाचण्यांसाठी किट मागवण्याची प्रक्रिया तेजीत आहे. डॉक्टर्ससह काही तंत्रज्ञ, ब्रदर्स यांनादेखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित अनेक गंभीर रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक डॉक्टर्सदेखील बाधित झालेले आहेत. त्यापैकीच एका गंभीर रुग्णावर या थेरपीने शुक्रवारी (ता.चार) उपचार केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गुरुवारी (ता.तीन) आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ.अर्चना पाटील यांनी देखील मेट्रो रक्तपेढीत भेट देऊन प्लाझ्मा थेरपीसंदर्भात आढावा घेतला.  

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT