हिंगोली घरकूल तिसरा टप्पा 
मराठवाडा

हिंगोली नगरपरिषदेच्या नवीन तीन प्रकल्पास शासनाची मंजूरी

मंजूर झालेल्या ९५८ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोली नगरपरिषदेस यापूर्वी सहा प्रकल्प अहवालास केंद्र व राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. ज्यामध्ये एक हजार ९८ घरकुले मंजूर आहेत. याकरीता २७. ४५ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी १४. ६६ कोटीचा निधी हिंगोली नगरपरिषदेस प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांनी दिली आहे.

मंजूर झालेल्या ९५८ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. सदरील मंजूर लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी ४० हजार प्रत्येकी प्रमाणे एकुण ६७४ लाभाथ्यांना २. ६९ कोटी, दुसऱ्या हप्त्यापोटी एक लाख रुपये प्रत्येकी प्रमाणे ६२९ लाभार्थ्यांना ६२९ कोटी, तिसऱ्या हप्त्यापोटी ६० हजार प्रत्येकी प्रमाणे एकुण ५६२ लाभार्थ्यांना ३. ३७ कोटी आणि चौथ्या हप्त्यापोटी ५० हजार प्रत्येकी प्रमाणे ४६० लाभार्थ्यांना २.३० कोटी असा प्राप्त झालेला १४. ६६ कोटी आत्तापर्यंत वितरीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार आजपर्यत ६०० घरकुलांची कामे पुर्ण झालेली आहेत.

हेही वाचा - लसीकरणासाठी भूमिपुत्र तालुका वैद्यकीय अधिकारी मूळगावी मुक्कामी

मंजूर निधीपैकी उर्वरित निधी १३. ७८ कोटी रुपये केंद्र शासनाकडून येणे बाकी आहेत. सहा डी. पी. आर. व्यतिरिक्त नवीन तीन डी. पी. आरला शासनाची मंजूरी प्रदान झालेली असून यामध्ये प्रकल्प अहवाल क्रमांक सातमधील लाभार्थी संख्या ४२१, प्रकल्प अहवाल क्रमांक आठमधील लाभार्थी संख्या १८८ आणि प्रकल्प अहवाल क्रमांक नऊमधील ५९७ लाभार्थ्यांच्या समावेश आहे. त्याअनुषंगाने सदरील एकुण १, २०६ पात्र लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाकरीता कार्यारंभ देण्याची कार्यवाही हिंगोली नगरपरिषद कार्यालयामार्फत सुरु आहे. सदरील नविन मंजूर झालेल्या तीन डी. पीआरकरीता केंद्र शासना मार्फत १८. ०९ कोटी व राज्य शासनामार्फत १३. ०६ कोटी असे ३०. १५ कोटी निधी प्राप्त होणे बाकी असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT