file photo 
मराठवाडा

शासकीय रक्तपेढी म्हणजे लॉजिंग, बोर्डींग...!

गणेश पांडे

परभणी : अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला धर्मशाळेचे स्वरूप आले आहे. कोरोना कक्षासह विविध विभागांतील कर्मचारी, रुग्णवाहिकांचे वाहनचालक रक्तपेढीचा लॉजिंग, बोर्डिंग म्हणून वापर करू लागले आहेत. त्यामुळे जर तेथील रक्त संक्रमित झाले तर शेकडो रुग्णांच्या जिवावर बेतू शकते.
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीतून दररोज शेकडो रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळते. म्हणून तेथील सुरक्षा व स्वच्छता अतिशय संवेदनशील समजली जाते. अन्न व औषधी प्रशासनाची रक्तपेढीसाठी अतिशय कठोर नियमावली असून रक्तपेढीत कार्यरत कर्मचाऱ्यांशिवाय तेथे अन्य कुणीही प्रवेश करू नये, असा दंडक आहे. परंतु, येथील रक्तपेढीत रुग्णालयातीलच कर्मचारी नियमभंग करून रुग्णांच्या जीविताशी खेळत असल्याचे चित्र आहे.

रक्तपेढी म्हणजे ‘आवो, जावो घर तुम्हारा’
जिल्हा रुग्णालयातच्या रक्तपेढीत दिवसरात्र तेथीलच आरोग्य कर्मचाऱ्यांचा राबता असतो. अनेक वेळा रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्यांवरदेखील प्रतीक्षा करण्याची वेळ येते. तेथेच जेवण, तेथेच आराम, तेथीलच स्वच्छतागृहांचा वापर केल्या जातो. रात्री तर या रक्तपेढीला धर्मशाळेचे स्वरूप येते. वातानुकूलित असल्यामुळे रात्रपाळी असलेले कर्मचारी, दिवसपाळी केलेले परजिल्हा, तालुक्यातील कर्मचारी, सध्या कोरोना कक्षातील कर्मचारी, विविध रुग्णवाहिकांचे वाहनचालक यांची दररोज रक्तपेढीतच मैफील बसते. तेथेच जेवणखान होते, गप्पा रंगतात व तेथेच ताणूनदेखील दिल्या जाते. अधूनमधून तर्पण सुद्धा केल्या जात असल्याचे समजते. रुग्णालय परिसरात शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने असताना यांची वाहने मात्र थेट रक्तपेढीत घुसवून आतमध्ये ठेवली जातात.

रक्त संक्रमित झाले तर..?
सद्यःस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णालयातीलच काहींना कोरोनाची लागन सुद्धा झालेली आहे. रुग्णवाहिकांचा वापरदेखील कोरोना संशयित, बाधित रुग्णांचे ने-आण करण्यासाठी होतो. कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेहदेखील याच वाहिकांनी नेले जातात. कोरोनाच्या कक्षात काम करणाऱ्यांनादेखील कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या विविध विभागांतील कर्मचारी, वाहनचालक रक्तपेढीचा लॉजिंग व बोर्डिंगसारखा करीत असलेला वापर धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्तपेढीतदेखील रक्तांच्या विविध तपासण्या केल्या जातात, अशा परिस्थितीत जर ते रक्त संक्रमित झाले तर हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रक्तपेढी, प्रयोगशाळेसारख्या संवेदनशील केंद्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT