parbhani hospital 
मराठवाडा

मागील महिन्यात रुग्णालयास मंजुरी, या महिन्यात निधी, जागेचा प्रश्‍न कायम...

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भौतिक सुविधा व मनुष्यबळाच्या अभावामुळे कोरोना महामारीत देखील महापालिकेचा आरोग्य विभाग रॅपीड टेस्ट, सर्वेक्षण याशिवाय फारसे काही करु शकला नाही. परंतु, आता शासनाने गत महिण्यात ६० खाटांचे रुग्णालय मंजुर केलेच. परंतु त्याच बरोबरच पाच कोटीचा निधीदेखील दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा तर मिळणार आहेत, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयावरील देखील ताण कमी होणार आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत शहरात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. परंतु, त्याठिकाणी लसीकरणासह बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित आहे. सर्दी, ताप, खोकला अशा जुजबी आजारावर तेथे कसेबसे उपचार केले जातात. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखावर पोहचलेली असतांना देखील आंतररुग्ण नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय उरला नव्हता. वैद्यकीय अधिकारी या पदासह अनेक पदे रिक्त आहेत. कंत्राटी पध्दतीने भरती करून पालिका आपला आरोग्य विभाग कसाबसा चालवत आहे. महापालिकेला सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. परंतु तीन-चार इमारती बांधल्या. काहींना जागा मिळेना तर काही उद्‍घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. पाच-सहा वर्षापुर्वी निधी येऊनही ही प्रक्रिया अद्यापही रखडलेलीच आहे. 

६० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी... 

महापालिकेच्या तत्कालीन महापौर मिना सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सभापती सचिन देशमुख यांनी शासनाकडे अनेक प्रस्ताव पाठवले होते. त्यामध्ये या ६० खाटांच्या रुग्णालयाचा देखील प्रस्ताव होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे, तसेच पाच कोटी रुपये निधीदेखील प्राप्त झाला आहे. 

जागेचा प्रश्न कायम... 

या रुग्णालयासाठी दिड-दोन एकर जागेची गरज आहे. परंतु, पालिकेकडे जागा नसल्याचे सांगण्यात येते. सध्या कल्याण मंडपम् मंगल कार्यालयाच्या बाजूस असलेल्या पालिका रुग्णालयाच्या परिसरातच हे रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार असल्याचे बोलले जाते. पालिकेला या रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे पालिकेने सद्यस्थितीत आपल्या एखाद्या इमारतीत तात्पुरते रुग्णालय सुरु करणे गरजेचे आहे. पालिकेची सुपर मार्केटची इमारत ओस पडली आहेत. तिच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर मोठे हॉल्स आहेत. काही भाड्याने दिले आहेत तर काहींवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आलेला आहे. तेथे जर हे रुग्णालय सुरु झाले तर या मार्केटला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT