मंठा ः येथील ट्रॉमा केअरसह ग्रामीण रुग्णालयाचा परिसर.
मंठा ः येथील ट्रॉमा केअरसह ग्रामीण रुग्णालयाचा परिसर.  
मराठवाडा

सरकारी दवाखान्यांना रिक्तरोगाची बाधा 

महेश गायकवाड

जालना -  जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय सध्या रिक्‍तरोगाने ग्रस्त झाले आहे. त्यामुळे डॉक्‍टरांपासून रुग्णांपर्यंत साऱ्यांचेच हाल आहेत. आता आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी जिल्ह्यातील राजेश टोपे यांच्याकडे आली आहे. तेच आता रिक्‍तरोग दूर करण्याचे इंजेक्‍शन आरोग्य प्रशासनाला टोचतील, अशी आशा लागून आहे. 

जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कमी मनुष्यबळावर रुग्णसेवेचा भार आहे. जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. 

खासगी रुग्णालयाप्रमाणे शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी महिला रुग्णालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होत आहे. मात्र, अपुऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. रिक्त पदांबाबत आरोग्य यंत्रणेतर्फे शासनास वारंवार अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र, शासनस्तरावर पदभरतीची प्रक्रिया रखडल्याने रिक्त पदांचा प्रश्‍न कायम असल्याचे अधिकारी सांगतात. 

तज्ज्ञ डॉक्‍टरांची पदे रिक्त 

मोठ्या आजारावर उपचारासाठी सामान्यांना खासगी रुग्णालयाचा खर्च झेपत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, या रुग्णालयात स्त्रीरोग, त्वचारोग, क्षयरोग व मनोविकार तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. याबरोबर ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयातही नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर रुग्णांच्या सेवेसाठी विविध विभागांतील आवश्‍यक अशा विविध संवर्गातील 63 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत. 

जालना जिल्ह्यातील सर्वच आरोग्य विभागांचा आढावा घेणार आहे. येथील सर्वच रिक्त जागा शासनस्तरावरून पाठपुरावा करून नियमानुसार भरण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांना अत्याधुनिक मशिनरी नाही, ती उपलब्ध करण्याबरोबर तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. 
राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र 

कर्मचाऱ्यांच्या काही रिक्‍त पदांचा लेखाजोखा 

  • अंबड उपजिल्हा रुग्णालय ः सहायक अधिसेविका 1, परिचारिका 2, अधिपरिचारिका 1, प्रयोगशाळा सहायक 1, शिपाई, कक्षसेवक, व्रणोपचारक, शस्त्रक्रियागार परिचर प्रत्येकी एक रिक्त. 

  • घनसावंगी ग्रामीण रुग्णालय : शिपाई व सफाई कामगारांची प्रत्येकी एक, तर कक्षसेवकांची दोन पदे रिक्त आहेत. तसेच ट्रॉमा केअर युनिटमध्ये कक्षसेवक व सफाई कामगारांची प्रत्येकी दोन पदे रिक्त. 

  • मंठा ग्रामीण रुग्णालय : रुग्णालयात एक शिपाई, दोन सफाई कामगार तर ट्रॉमा केअर युनिटमध्ये एक कक्षसेवक व दोन सफाई कामगारांची पदे रिक्त. 

  • टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालय : एक शिपाई, दोन सफाई कामगारांची पदे रिक्त. 

  • जाफराबाद ग्रामीण रुग्णालय : दोन सफाई कामगारांची पदे रिक्त.

  • नेर ग्रामीण रुग्णालय : कक्षसेवकांची दोन, शिपाई व सफाई कामगारांचे प्रत्येकी एक पद रिक्त. 

  • बदनापूर ग्रामीण रुग्णालय : शिपाई, कक्षसेवक, सफाई कामगार यांचे प्रत्येकी एक पद रिक्त. 

  • परतूर ग्रामीण रुग्णालय : कक्षसेवक व सफाई कामगारांचे प्रत्येकी एक पद रिक्त. 

  • भोकरदन ग्रामीण रुग्णालय : कक्षसेवक, सफाई कामगारांचे प्रत्येकी एक पद रिक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT